मोठी बातमी; राजकीय वादातून सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून
By आप्पासाहेब पाटील | Updated: January 2, 2026 19:02 IST2026-01-02T18:55:00+5:302026-01-02T19:02:57+5:30
Solapur Crime News: राजकीय वादातून सोलापुरातील रविवार पेठ, जोशी गल्ली येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्षाचा खून करण्यात आला आहे. या घटनेनंतर सोलापुरात मोठा राडा झाला असून रविवार पेठेतील भाजपाचे कार्यालय फोडण्यात आल्याचे सांगितले.

मोठी बातमी; राजकीय वादातून सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - राजकीय वादातून सोलापुरातील रविवार पेठ, जोशी गल्ली येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्षाचा खून करण्यात आला आहे. या घटनेनंतर सोलापुरात मोठा राडा झाला असून रविवार पेठेतील भाजपाचे कार्यालय फोडण्यात आल्याचे सांगितले.
दरम्यान, बाळासाहेब पांडूरंग सरवदे असे खून झालेल्या मनसे पदाधिकाऱ्याचे नाव आहे. राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. याबाबत मनसेचे शहराध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी माध्यमांना माहिती दिली. या घटनेनंतर रविवार पेठेत पोलिस बंदोबस्त वाढविला आहे. घटनेनंतर बाळासाहेब सरवदे यास उपचारासाठी सोलापुरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्याठिकाणीही जमावांनी गोंधळ घालत हॉस्पीटलमधील साहित्यांची तोडफोड केली. त्यानंतर रूग्णालयात पोलिस दाखल होताच परिस्थिती नियंत्रणात आली. सध्या बाळासाहेब सरवदे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात आणण्यात येत आहे. त्यामुळे शासकीय रूग्णालयात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.