Big news; Accident at sugar factory at Angar; Two killed, six injured | मोठी बातमी; अनगर येथील साखर कारखान्यात दुर्घटना; दोन ठार, सहा कामगार जखमी

मोठी बातमी; अनगर येथील साखर कारखान्यात दुर्घटना; दोन ठार, सहा कामगार जखमी

मोहोळ : मिथेन गॅसची टाकी खाली कोसळून झालेल्या वायुगळतीमुळे झालेल्या दुर्घटनेत दोघे ठार तर सहाजण जखमी झाल्याची दुर्देवी घटना लोकनेते साखर कारखान्यावर २२ नोव्हेंबर रोजी रात्री १२ .३० चे दरम्यान घडली .

 याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यातील अनगर येथील लोकनेते साखर कारखान्यावर  दिनांक २२  रोजी रात्री साडेबाराच्या दरम्यान कारखान्याचे गाळप सुरू असताना अचानक मिथेन गॅसच्या टाकीत असणाऱ्या गॅसचे टाकीमधील गॅस व लिक्वीडचे प्रमाण कमी जादा झाल्याने टाकी खाली कोसळुन झालेल्या आपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत.

 मृतामधे ज्योतिबा दादाराव वगरे (वय  ४५, राहणार बिटले),  सुरज अंकुष चव्हाण (वय २२ राहणार बिटले) यांचा समावेश असून जखमीमध्ये सज्जन जोगदंड (वय २० रा बिटले), मंगेश पाचपुंड (वय  २४ रा अनगर), महेश बोडके (वय २० रा  अनगर), कल्याण गुरव (वय २९ रा बिटले),  परमेश्वर थिटे (वय २५ रा  नालबंदवाडी), राजू गायकवाड (वय २० रा कुरणवाडी),  रवींद्र काकडे (वय २९ रा  अनगर),  संजय पाचेे (वय ४५ रा. अनगर) हे गंभीर जखमी झाले आहेत.

 या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक सायकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष इंगळे यांच्यासह पोलिस तातडीने कारखान्यावर धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी सोलापूरला पाठविले.  पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Big news; Accident at sugar factory at Angar; Two killed, six injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.