सोलापूर : गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी हैदराबादकडून चार चाकी वाहनातून ३१८ किलो (६३ लाख ६१ हजार ९०० रुपये) किमतीचा ११ पती गांजा महूदकडे घेवून जात असताना चार चाकी वाहनासह जप्त केला. ही कारवाई सोमवारी पहाटे दीडच्या सुमारास महूद - पंढरपूर रोडवरील हॉटेल जयभवानी समोर केली. या कारवाईत चालकास ताब्यात घेतले. ही कामगिरी उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्यासह पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
मोठी बातमी; हैदराबादकडे निघालेला ३१८ किलोचा गांजा जप्त; सांगोला पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 09:41 IST