शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 11:04 IST

राज्यात अनेक निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतच्या निवडणुकीलाही स्थगिती दिली आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू आहेत. दरम्यान, काल राज्यातील काही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय समोर निर्णय समोर आला. सोलापूर जिल्ह्यातील चर्चेत असलेल्या अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित केली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबद आदेश जारी केला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती

मागील अनेक वर्षापासून अनगरमध्ये बिनविरोधाची परंपरा आहे. ग्रामपंचायतची नगरपंचायत झाल्यानंतर निवडणूक पहिल्यांदाच होत आहे. या निवडणुकीत उज्ज्वला थिटे यांनी आव्हान देत राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांच्याविरोधात अर्ज दाखल केला होता. पण, थिटे यांचा अर्ज अपात्र ठरला.  थिटे यांचा अर्ज अपात्र ठरल्यानंतर प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. 

दरम्यान, आता निवडणुकीताल स्थगिती दिल्यानंतर पुन्हा एकदा ट्विस्ट आला आहे. आता सुधारित कार्यक्रमानुसार येथील निवडणूक होणार आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंगळवेढा नगरपालिका आणि अनगर नगरपंचायत यांच्या निवड प्रक्रियेला स्थगिती आदेश दिले आहेत.

ज्या ठिकाणी अपील दाखल करण्यात आले होते. कोर्टाने २३ तारखेपर्यंत निकाल दिले आहेत. तिथे आधीची प्रक्रिया राहणार आहे. पण, अनगरचा निकाल २५ तारखेला झाल्याने तांत्रिक दृष्टीने प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. नवीन कार्यक्रमानुसार प्रक्रिया पार पाडताना अनगरमध्ये प्रत्येक पदासाठी केवळ एक अर्ज असल्याचे निवडणूक आयोगला कळवले जाईल. त्यानंतर निवडणूक आयोगातर्फे बिनविरोध निवडीची घोषणा होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Uncontested Angar Election Drama: Patil's Daughter-in-law's Victory Halted, Re-election Ordered

Web Summary : The uncontested election of Prajakta Patil in Angar, Solapur, has been stayed. The District Collector ordered a re-election after an appeal process technicality. This reverses the earlier unopposed selection due to an opponent's disqualification. New elections will proceed following a revised schedule.
टॅग्स :Electionनिवडणूक 2024SolapurसोलापूरBJPभाजपा