बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 11:04 IST2025-12-01T11:03:34+5:302025-12-01T11:04:13+5:30
राज्यात अनेक निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतच्या निवडणुकीलाही स्थगिती दिली आहे.

बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार?
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू आहेत. दरम्यान, काल राज्यातील काही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय समोर निर्णय समोर आला. सोलापूर जिल्ह्यातील चर्चेत असलेल्या अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित केली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबद आदेश जारी केला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
मागील अनेक वर्षापासून अनगरमध्ये बिनविरोधाची परंपरा आहे. ग्रामपंचायतची नगरपंचायत झाल्यानंतर निवडणूक पहिल्यांदाच होत आहे. या निवडणुकीत उज्ज्वला थिटे यांनी आव्हान देत राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांच्याविरोधात अर्ज दाखल केला होता. पण, थिटे यांचा अर्ज अपात्र ठरला. थिटे यांचा अर्ज अपात्र ठरल्यानंतर प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती.
दरम्यान, आता निवडणुकीताल स्थगिती दिल्यानंतर पुन्हा एकदा ट्विस्ट आला आहे. आता सुधारित कार्यक्रमानुसार येथील निवडणूक होणार आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंगळवेढा नगरपालिका आणि अनगर नगरपंचायत यांच्या निवड प्रक्रियेला स्थगिती आदेश दिले आहेत.
ज्या ठिकाणी अपील दाखल करण्यात आले होते. कोर्टाने २३ तारखेपर्यंत निकाल दिले आहेत. तिथे आधीची प्रक्रिया राहणार आहे. पण, अनगरचा निकाल २५ तारखेला झाल्याने तांत्रिक दृष्टीने प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. नवीन कार्यक्रमानुसार प्रक्रिया पार पाडताना अनगरमध्ये प्रत्येक पदासाठी केवळ एक अर्ज असल्याचे निवडणूक आयोगला कळवले जाईल. त्यानंतर निवडणूक आयोगातर्फे बिनविरोध निवडीची घोषणा होईल.