विश्वासघात! परप्रांतीय तरुणाने शेतमालकाची दुचाकी पळविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 09:35 IST2022-04-26T09:33:29+5:302022-04-26T09:35:24+5:30

शिरभावी येथील बाळासाहेब बंडगर यांच्याकडे मागील चार महिन्यांपासून उत्तर प्रदेशातील छोटू नावाचा परप्रांतीय तरुण कामास होता

Betrayal! A young man from a foreign country snatched a farmer's two-wheeler | विश्वासघात! परप्रांतीय तरुणाने शेतमालकाची दुचाकी पळविली

विश्वासघात! परप्रांतीय तरुणाने शेतमालकाची दुचाकी पळविली

सोलापूर/सांगोला : परप्रांतीय तरुणाने शेतमालकाचा विश्वास संपादन करून त्यांची ५० हजारांची दुचाकी घेऊन गेल्याची घटना सांगोला तालुक्यात शिरभावी येथे घडली. याबाबत, शेतकरी बाळासाहेब तुकाराम बंडगर यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी छोटू (रा. उत्तर प्रदेश) या परप्रांतीय तरुणावर दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

शिरभावी येथील बाळासाहेब बंडगर यांच्याकडे मागील चार महिन्यांपासून उत्तर प्रदेशातील छोटू नावाचा परप्रांतीय तरुण कामास होता. तो त्यांच्याकडेच राहण्यास होता. त्यांचा त्याच्यावर विश्वासही बसला होता. दरम्यान, तो चांगले काम करीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याबाबत पूर्ण नावाची खात्री केली नव्हती. दरम्यान, छोटूने नेहमीप्रमाणे त्यांची विनानंबर हिरो होंडा कंपनीची दुचाकी काही एक न सांगता घेऊन गेला तो परत आलाच नाही.

Web Title: Betrayal! A young man from a foreign country snatched a farmer's two-wheeler