शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

बेटी बचाव :मुलगी जन्माला येताच आजकाल सोलापूरकर कौतुकानं मेसेज टाकतात, ‘लक्ष्मी आली घरीऽऽ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 3:17 PM

सोलापूर : एकेकाळी कुटुंबात मुलगी जन्माला आली की नाखुशीनेच स्वीकार केला जायचा. मात्र अलीकडे ही मानसिकता सोलापुरातही बदलायला लागली ...

ठळक मुद्दे‘लोकमत’च्या व्यासपीठावर सोलापुरातील प्रसूतीशास्त्र डॉक्टरांनी सांगितले अनुभवआजकाल सोलापूरकर मोठ्या कौतुकाने मोबाईलवरून मेसेज टाकतात,‘लक्ष्मी आली हो आमच्या घरीऽऽऽ’ !

सोलापूर : एकेकाळी कुटुंबात मुलगी जन्माला आली की नाखुशीनेच स्वीकार केला जायचा. मात्र अलीकडे ही मानसिकता सोलापुरातही बदलायला लागली आहे. स्त्रीजन्माचे स्वागत करताना कुणी पेढे वाटतात, आजकाल सोलापूरकर मोठ्या कौतुकाने मोबाईलवरून मेसेज टाकतात,‘लक्ष्मी आली हो आमच्या घरीऽऽऽ’ !

‘लोकमत’ चर्चासत्राच्या उपक्रमांतर्गत ‘बेटी बचाव’या विषयावरील चर्चासत्रा दरम्यान लोकमतच्या आवृत्ती कार्यालयात सोलापुरातील डॉक्टरांनी आपले अनुभव सांगितले. सोलापूर स्त्रीरोग-प्रसूतीशास्त्र संघटनेच्या अध्यक्षा डॉ. माधवी दबडे, आयसोपार्ब संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. मिलिंद शहा, डॉ. सुजाता कुलकर्णी, डॉ. वर्षा किरपेकर, डॉ. भारती तडवळकर, डॉ. बाहुबली दोशी आणि डॉ. मोनिका उंबरदंड या स्त्रीरोग तज्ज्ञांच्या चर्चेतून स्त्रीभ्रूणहत्या, समाजाची बदलती मानसिकता, महिला आणि तरूणींची सामाजिक सुरक्षितता यासारखे विषय फुलत गेले. या चर्चासत्रातून त्यांनी स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी उपायही सुचविले. 

चर्चेच्या प्रारंभीच सामाजिक मानसिकतेच्या मुद्यावरून विषय झाला. सोलापुरात भू्रणहत्येसंदर्भात सकारात्मक बदल घडत असल्याचे मत या डॉक्टर्स मंडळींनी मांडले. ग्रामीण भागात आजही काही प्रमाणात ही मानसिकता काही प्रमाणात कायम असली तरी घडायला लागलेला बदल स्वागतार्ह असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सोनोग्राफीने लिंगनिदान सोपे झाले. 

गुजरातमध्ये तर पूर्वी सोनोग्राफी केंद्रांवर ‘बालक-बालिका तपासणी केंद्र’ असे फलक असायचे. कायद्याच्या बंदीनंतर हे फलक हटले. अलीकडे तर गर्भपातासाठी येणाºयांमध्ये लवकर मुल  नको असणाºया जोडप्यांच्या संख्येतही वाढ झाल्याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले. डॉ. माधवी दबडे यांनी सोशल मीडिया आणि टीव्हीवरच्या जाहिरातींना जबाबदार ठरविले. टीव्हीवरील जाहिरातीमध्ये मुलगा-मुलगी आणि आईबाबा असे कुटुंब दाखवितात. त्याऐवजी दोन मुली का दाखवित नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

अनुभव असेही... 

  • यावेळी डॉक्टरांनी अनेक सकारात्मक अनुभवही सांगितले. डॉ. मिलिंद शहा म्हणाले, सुमारे पंधरा वर्षापूर्वी एक सुशिक्षीत नोकरदार जोडपे आपल्याकडे गर्भपातासाठी आले होते. मुलगी असल्याने गर्भपात करून घेण्यावर ते ठाम होते. मात्र चर्चेनंतर त्यांचे मनरिवर्तन झाले. आज ही मुलगी अभ्याससह सर्वच बाबतीत प्रचंड हुशार निघाली. हे जोडे जेव्हाजेव्हा भेटते, तेव्हा आवर्जून त्या प्रसंगाची आठवण करतात.
  • डॉ. वर्षा किरपेकर यांनी एका प्रोफेसर कुटुंबातील सांगितलेला अनुभव अगदीच वेगळा आहे. दोन मुलींच्या पाठीवर पुन्हा मुलगीच झाल्यावरही ते जोडपे प्रचंड खुश झाले. डॉ. सुजाता कुलकर्णी यांनीही असाच अनुभव सांगितला. एका शेतकरी कुटुंबात पहिली मुलगी होती. नंतरच्या चान्समध्येही त्यांना पुन्हा मुलगीच हवी होती. शिक्षित आणि शहरी तर सोडा, मात्र ग्रामीण कुटुंबामध्ये दिसणारी ही मानसिकता मनाला भावल्याचे त्या म्हणाल्या.
  • डॉ. भारती तडवळकर म्हणाल्या, एका मुस्लीम कुटुंबाला मुलगी हवी होती. मात्र मुलगाच झाल्यावर कालांतराने त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली. आज ती  मुलगी उच्चशिक्षित झाली असून, कुटुंबात सर्वांचीच लाडकी आहे.
  • डॉ. बाहुबली दोशी यांनी आपल्या कुटुंबातील स्वानुभव सांगितले. त्यांची मुलगी अमेरिके त आहे. तिथे पहिल्या चान्समध्ये तपासणीची संधी असते. मात्र तिने ती नाकारली. पहिल्यांदा मुलगा झाला. दुसºया चान्समध्ये मात्र तिला मुलगी हवी होती. तशी तिची प्रबळ इच्छा होती. मात्र मुलगाच झाला. ओटीमध्ये हे कळताच तीने हंबरडाच फोडला. ‘देवा, असे मी काय पाप केले, मला दुसरा मुगलाच दिला’, असे म्हणून ती रडायला लागली. पुढे तिने हा विषय मनाला एवढा लावून घेतला की बराच काळ ती याच मानसिकतेत गुरफटून राहिली होती.
  • डॉ. माधवी दबडे यांनी सांगितलेला अनुभवही दुर्मिळ म्हणावा असाच होता. दोन मुली असलेल्या एका कुटुंबात दोघींच्या पाठीवर पुन्हा तिसरीही मुलगीच झाली. मात्र हे कळल्यावर त्या कुटुंबात एवढा आनंद झाला की त्यांनी चक्क दवाखानाभर पेढे वाटले.

वंशाला मुलगाच हवा ही मानसिकता जशी खेड्यात मुळ धरून आहे, तशी शहरातही दिसते. आता त्यात बदल दिसत आहे़ पूर्वी तर मुलगी झाली म्हटले की चक्क शोक व्यक्त केल्यागत स्थिती दिसायची. शिक्षणाचा अभाव हे यामागचे कारण आहे. आता परिस्थिती बदलत चालली आहे तरीही आणखी सुधारणा व्हावे.- डॉ. मिलिंद शहा 

गर्भपाताची खरी समस्या वाढली ती तपासून घेण्यामुळे. ज्या समाजात आर्थिक सक्षमता आणि सुधारणांचे प्रमाण वाढलेले आहे त्याच समाजात आणि कुटुंबांमध्ये गर्भपाताचे प्रमाण वाढलेले दिसते. आपल्या दवाखान्यात मागील ४० वर्षांत तांत्रिक अपवाद वगळता एकही तसे कुटुंब गर्भपात करून घ्यायला आले नाही. - डॉ. बाहुबली दोशी 

स्त्रियांना आर्थिक स्वावलंबनाची गरज आहे. स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर तिला कुटुंबात आवाज असतो. कुटुंबाला आधार म्हणून मुलगाच हवा हा पिढीजात दृष्टिकोन आहे. तो बदलण्याची गरज आहे. मुलीही हल्ली उत्तमपणे शिक्षण घेत आहेत. पुरुषाला खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात अग्रेसर होत आहेत.- डॉ. वर्षा किरपेकर

सरकारी नियमही याला जबाबदार आहेत. दोन मुले असतील तरच नोकरी असा नियम आल्याने किमान एकतरी मुलगाच असावा या लालसेने अनेक कुटुंबे अवैध लिंगतपासणीला बळी पडतात. दुसºया मुलीवर पुन्हा मुलगीच झाली की कुटुंबातील नाराजी स्पष्टपणे दिसते. अगदी बिल भरताना घासाघीस करण्यापासून ही सुरूवात होते. - डॉ.माधवी दबडे 

केवळ उच्चभ्रूंच्या वसाहतीतच नाही तर झोपडपट्टीतही हेच चित्र आहे. समाजात वृद्धांना सुरक्षा असणे महत्त्वाचे आहे. वृद्धपणी आधारासाठी मुलगा असावा, ही प्रत्येकाची भावना असते आणि ती स्वाभाविकही आहे. सरकारने वृद्धांना योग्य आधार दिल्यास समाजाचा दृष्टिकोन बदलण्यास वेळ लागणार नाही.- डॉ. मोनिका उंबरदंड

मुलापेक्षा मुलगीच सक्षमपणे आधार ठरू शकते. मुलांनी  आईवडिलांकडे पाठ फिरविली असताना मुली सांभाळ करत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. मुलींना आपला संसार सांभाळून हे करणे अवघड जाते. त्यामुळे सरकारने वृद्धांची सामाजिक जबाबदारी स्वीकारली तर मुलींना गर्भातच संपविण्याचा प्रकार थांबविता येईल.- डॉ. सुजाता कुलकर्णी

मुली आणि तरूणींच्या सुरक्षिततेची सामाजिक समस्या लक्षात घ्यायला हवी. मुलींचे विवाह लवकर करण्यामागेही पालकांची हीच मानसिकता असते. मुलींना कुटुंबात अधिक काळ जपण्यापेक्षा मुलगा असलेला बरा ही मानसिकता त्यातूनच आल्याचे त्या म्हणाल्या. ही स्थिती आता बदलायला हवी.- डॉ. भारती तडवळकर 

टॅग्स :SolapurसोलापूरWomenमहिलाdocterडॉक्टर