शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

हुतात्मा कुर्बान हुसेन यांच्या उल्लेखाचा धडाच बालभारतीने अखेर वगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 13:01 IST

सोलापुरात नाराजी; कोरोनाने अभ्यासक्रम कपातीचे पुढे केले कारण

ठळक मुद्देकुर्बान हुसेन यांना इंग्रजांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल दोषी ठरवून, १२ जानेवारी १९३१ रोजी फासावर चढविलेटिळकांचे अनुयायी हुतात्मा कुर्बान हुसेन यांचा उल्लेख असलेला धडा वगळण्यात आला. हा हुतात्म्यांचा अपमान आहे

सोलापूर : सोलापूरकरांसाठी अत्यंत भूषणावह चार हुतात्म्यांपैकी एक कुर्बान हुसेन यांचा उल्लेख असलेला इयत्ता आठवीच्या बालभारतीमधील (मराठी) धडाच आता वगळण्यात आला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा कधी सुरु होतील याविषयी निश्चिती नाही. यामुळे अभ्यासक्रम कपातीचा निर्णय घेण्यात आला. सोलापूरकरांनी धडा वगळण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.आठवीच्या अभ्यासक्रमातील पुस्तकात क्रांतिकारक भगतसिंह, राजगुरू यांच्यासह हुतात्मा कुर्बान हुसेन यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. पण  भगतसिंग, राजगुरु यांच्यासमवेत सुखदेव यांचे नाव नसल्यामुळे आक्षेप घेण्यात आला होता. ही सर्व पुस्तके मागे घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी काही संघटनांनी केली होती.

लेखक यदुनाथ थत्ते यांच्या प्रतिज्ञा या पुस्तकातील लेख जसाच्या तसा आठवीच्या बालभारती पुस्तकात वापरण्यात आला आहे. हुतात्मा कुर्बान हुसेन यांनीही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वत:चे बलिदान दिलेले आहे. इंग्रजांनी त्यांच्यासह सोलापूरच्या मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे आणि श्रीकिसन सारडा यांना फासावर चढविले होते. असे असताना कुर्बान हुसेन यांच्या नावावर आक्षेप घेतल्याबद्दल सोलापुरात संताप व्यक्त  झाला होता.

अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हे सोलापूर येथील स्वातंत्र्य चळवळीतले पत्रकार होते. कुर्बान हुसेन यांना इंग्रजांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल दोषी ठरवून, १२ जानेवारी १९३१ रोजी फासावर चढविले. त्यावेळी कुर्बान हुसेन यांचे वय अवघे २२ वर्षे होते.

पद्यपाठही वगळले!यंदाच्या शैक्षणिक वर्षातील दीड महिन्याचा कालावधी हा सध्या संपून गेला आहे. त्यामुळे उरलेल्या कालावधीत पूर्ण अभ्यासक्रम घेणे शक्य होणार नाही. याचा विचार करुन शिक्षण मंडळाने २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला. आठवीच्या बालभारतीमध्ये ‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे ’या धड्यासोबतच ‘धाडसी कॅप्टन : राधिका मेनन’, ‘फुलपाखरे’, ‘लिओनार्दो द  व्हिंची’ (स्थूलवाचन), तसेच ‘नव्या युगाचे गाणे’, ‘विद्याप्रशंसा’, ‘अन्नजाल’ हे पद्यपाठ देखील वगळले आहेत.

हुतात्मा कुर्बान हुसेन हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांनी ‘गझनफर’ हे उर्दू भाषेतील साप्ताहिक सोलापुरात सुरु केले होते. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, स्वदेशी या पंचसूत्रीवर ते काम करत होते. यंदाचे वर्ष हे लोकमान्य टिळकांचे स्मृतीशताब्दी वर्ष आहे. या वर्षी टिळकांचे अनुयायी हुतात्मा कुर्बान हुसेन यांचा उल्लेख असलेला धडा वगळण्यात आला. हा हुतात्म्यांचा अपमान आहे. याचे मला मनस्वी दु:ख होत आहे.- डॉ. श्रीकांत येळेगावकर

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणmarathiमराठीSchoolशाळा