शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपार्ह छायाचित्र टाकणारा अटकेत

By admin | Updated: June 9, 2014 01:15 IST

आणखी एकावर गुन्हा : मजकूर डिलिट करा अथवा पोलिसांना कळवा

सोलापूर : सोशल साईटवर राष्ट्रपुरुषाच्या अवमानप्रकरणाचा तपास सुरू असताना सातत्याने आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्रे एका तरुणाकडून टाकले जात असल्याचे दुसरे एक प्रकरण समोर आले आहे़ चोवीस तासात विजापूर नाका येथे एक तर दुसरा गुन्हा सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे़ दुसऱ्या गुन्ह्यात औदुंबर तुकाराम सरवदे (रा़ उजनी कॉलनी, सोलापूर) याला पोलिसांनी अटक केली आहे़याबाबत पहिल्या गुन्ह्यात सत्यजीत सुबोध वाघमोडे (वय २१, रा़ नवीन आरटीओजवळ, विजापूर रोड) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ शनिवारी रात्री सत्यजीत यांच्या मोबाईलवर सोशल साईटचा मेसेज आला़ त्या साईटवर जाऊन संबंधित अकौंट पाहिले असता एका राष्ट्रपुरुषाचे अवमानकारक छायाचित्र आणि मजकूर पोस्ट केले गेल्याचे दिसून आले़ याप्रकरणी त्यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला़ गुन्हे शाखेत सायबर क्राईममधून हे प्रकरण हाताळत असताना त्याच साईटवर पुन्हा एक अशीच पोस्ट नेहमी टाकणारा अकौंटधारक आढळून आला़ हे अकौंट औदुंबर सरवदे यांंचे असल्याचे स्पष्ट झाले़ त्याच्या अकौंटवर इचलकरंजीतील झकास गु्रपने ही पोस्ट टाकल्याचे आढळून आले़ एका प्रकरणाचा तपास करीत असताना अशाप्रकारे दुसरा गुन्हा उघडकीस आला़ दुसऱ्या प्रकरणात एस़बी़ खाडगे यांनी फिर्याद दिली आहे़ ---------------------------------------गुन्हे शाखेकडून तपास सुरु या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे़ याबाबत गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्याशी संपर्क साधला असता फेसबुकवरील संबंधित अकौंट आणि त्याची माहिती मिळविण्यासाठी अमेरिकेतील न्यायालयाकडे विनंती करून माहिती मागवली जाणार असल्याचे सांगितले़ तत्पूर्वी येथील न्यायालयात सोमवारी अमेरिकेतील न्यायालयास पत्रव्यवहार करण्याबाबत अर्ज केला जाणार असल्याचेही ते म्हणाले़ असे काही पोस्ट आपल्या अकौंटवर पडत असतील तर ती तत्काळ काढून टाका, याची पोलिसांना माहिती द्या असे आवाहनही बाहेती यांनी केले आहे़