VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 20:42 IST2025-07-05T20:30:11+5:302025-07-05T20:42:22+5:30
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
Ashadi Ekadashi 2025: आषाढी एकादशीसाठी अवघा काही दिवस उरले आहे. इंद्रायणीच्या काठावरून सुरू झालेला वारकऱ्यांच्या वारीचा प्रवास आता चंद्रभागेपर्यंत पोहोचला आहे. पांडुरंगाच्या दर्शनाची आस डोळ्यांत घेऊन वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. लाखो भाविकांनी पंढरी नगरी दुमदुमली आहे. प्रचंड गर्दीतही वारकऱ्यांकडून शिस्तीचे दर्शन घडताना दिसले. पंढरपुरात मंदिराजवळ गर्दीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला वारकऱ्यांनी वाट मोकळी दिली.
पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेसाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार आषाढीच्या निमित्ताने सुमारे १५ ते २० लाख भाविक पंढरपुरात दर्शनासाठी येणार आहेत. वारकऱ्यांनीही विठुरायाच्या मंदिराजवळ गर्दी केली आहे. याच गर्दीत एक रुग्णवाहिका अडकली होती. वारकऱ्यांनी हे पाहताच तिला वाट मोकळी करुन दिली. स्वयंसेवकाच्या मदतीने वारकऱ्यांनी रुग्णवाहिकेसाठी जागा केली आणि त्यानंतर ती पुढे गेली. यावेळी वारकऱ्यांनी दाखवलेल्या शिस्तीचे सर्वत्र कौतक होत आहे.
पंढरपूरात गर्दीतही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त; रुग्णवाहिकेसाठी मोकळी करून दिली वाट#Pandharpur#AshadiEkadashipic.twitter.com/b2qfscq6ij
— Lokmat (@lokmat) July 5, 2025
पालखी खांद्यावर घेऊन मुख्यमंत्र्यांचा दिंडी सोहळ्यात सहभाग
वाखरी येथे पोहोचलेल्या आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह पालखी खांद्यावर घेऊन दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला.