शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
11
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
12
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
13
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
14
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
15
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
16
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
17
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
18
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
20
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 

आषाढी वारी विशेष ; पंढरीवर ‘सीसीटीव्ही कॅमेरा’चा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 2:29 PM

आषाढी यात्रा सोहळा : मंदिर व पोलीस प्रशासनाचे १५३ सीसीटीव्ही कॅमेरे

ठळक मुद्देदर्शन मंडप व नामदेव पायरी येथे मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी मंदिर परिसरात कायमस्वरूपी ८० व तात्पुरते २० कॅमेरे बसविण्यात आले ६५ एकर परिसरात १६ सीसीटीव्ही बसविण्यात आले

सचिन कांबळे पंढरपूर : आषाढी यात्रा सोहळ्यादरम्यान कोणत्याही ठिकाणी काही अनुचित प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यास तो तत्काळ थांबवता यावा, यासाठी मंदिर व पोलीस प्रशासनाकडून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व शहरात एकूण १५३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ हेच सीसीटीव्ही कॅमेरे संपूर्ण आषाढी वारी सोहळ्यावर लक्ष ठेवणार आहेत़ 

आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी प्रमुख ९ पालख्यांसह शेकडो दिंड्या पंढरपुरात दाखल होतात. या दिंड्यांसह लाखो भाविक पायी वारी करीत पंढरपुरात येतात. त्याचबरोबर रेल्वे, एसटी व खासगी वाहनांनी येणाºया भाविकांची देखील संख्या जास्त आहे. यामुळे यात्रा कालावधीत शहरात १० ते १२ लाख भाविक येतात.

देशामध्ये कुठेही दहशतवादी कारवाई झाल्यास माहिती गुप्तचर विभागाकडून पंढरपूरला देखील हाय अलर्टचा संदेश दिला जातो. यामुळे बीडीडीएस पथक पंढरपूरला सतत तैनात असते़ यात्रा कालावधीत गर्दीच्यावेळी अशी कारवाई होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या बीडीडीएस पथकाद्वारे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची यात्रा कालावधीत तपासणी केली जाते.

तसेच मंदिर समितीच्या वतीने मंदिरात व मंदिर परिसरात १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. याद्वारे मंदिर प्रशासन मंदिर परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवते. तसेच चंद्रभागा वाळवंट, महाद्वार, नामदेव पायरी, संत तुकाराम भवन, संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडप, चौफाळा आदी परिसरातही सीसीटीव्ही आहेत़ विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रवेश करणाºया मुख्य दरवाज्यावर बॅग स्कॅनिंग मशीन बसवण्यात आली आहे. या मशीनद्वारे भाविकांच्या बॅगची तपासणी करण्याचे काम पोलीस प्रशासन करत आहे.

या ठिकाणी असेल कॅमेºयाची नजरविठ्ठल-रुक्मिणी समितीतर्फे मंदिर परिसरात कायमस्वरूपी ८० व तात्पुरते २० कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ याचा नियंत्रण कक्ष मंदिरात आहे़ पत्राशेड दर्शनरांगेत २४ कॅमेरे बसविण्यात आले असून त्याचा नियंत्रण कक्ष तेथेच उभारला आहे़ शिवाय ६५ एकर परिसरात १६ सीसीटीव्ही बसविण्यात आले असून याच परिसरात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे़ शहर पोलीस ठाण्याच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सावरकर चौक, शिवाजी चौक, चौफाळा, महाद्वार, पंढरपूर नगरपरिषद, भादुले चौक, नाथ चौक आदी चौकात भाविकांची जास्त गर्दी असते. यामुळे या ठिकाणी एकूण १३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या सर्व कॅमेºयांचा नियंत्रण कक्ष पोलीस ठाण्यात आहे. यामुळे कोणतीही  घटना घडल्यास पोलीस त्याठिकाणी तत्काळ पोहोचविण्यास अधिकाºयांना मदत होते.

मेटल डिटेक्टर व बॅग स्कॅनर मशीन- सुरक्षिततेच्या दृष्टीने विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनरांगेतील भाविकांची दर्शन मंडप व नामदेव पायरी येथे मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करून सोडण्यात येते. तसेच भाविकांच्या पिशव्या, पर्स, मोबाईल अशा वस्तूंची स्कॅनर मशीनद्वारे तपासणी करून दर्शनासाठी पाठविण्यात येते.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिसरात घडणाºया हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ तसेच भाविकांच्या सेवेसाठी ज्या ठिकाणी अधिकारी व कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे, त्या ठिकाणी ते योग्य प्रकारची सेवा बजावित आहेत की नाही हेही सीसीटीव्ही कॅमेºयामुळे समजणार आहे़ कामात कोण हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल़- सचिन ढोले,कार्यकारी अधिकारी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती.

आषाढी यात्रा सोहळ्यात आवश्यक पोलीस यंत्रणा आहेच, पण तरीही शहरात कोठे अनुचित प्रकार घडल्यास तेथील क्षणचित्रे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद होतील़ त्यामुळे त्वरित त्या ठिकाणी कारवाई करण्यास मदत होईल़ - श्रीधर पाडुळे,पोलीस निरीक्षक, पंढरपूर

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसAshadhi Ekadashiआषाढी एकादशी