शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

आषाढी वारी विशेष ; जीवनात चैतन्य निर्माण करणारी आषाढी वारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 2:53 PM

वारकºयांशी संवाद : पहिल्या वारीच्या आठवणी आजही कायम

ठळक मुद्देवारीचे सुख इतके आहे की, आता वारी सोडू शकत नाही - प्रल्हाद कोरकेपहिल्या वारीचे सुख आजही ते शोधत आहेत - शिवाजी रणदिवेपहिल्या वारीने विठ्ठलभेटीची आस लागली - शिवाजी कोळी

गोपालकृष्ण मांडवकरमाळशिरस : पहिल्या वारीची आत्मानुभूती काय वर्णावी? ही अनुभूती आयुष्यभर आठवणीत राहणारी, संपूर्ण आयुष्याला नवी चेतना देणारी आणि आयुष्याच्या रहाटगाडग्यात चैतन्याची सरिता प्रवाहित करणारी!

वारीला आलेल्या लाखो भाविकांमध्ये अनेकांच्या वाºया मोजदादीच्या पलीकडे गेल्या आहेत. वारीचे हे कितवे वर्ष आहे, याची मोजदाद ठेवण्यापेक्षा वारी आली की अंगात चैतन्य संचारल्यासारखे वारीला निघणारे लाखो वारकरी यात सहभागी आहेत. असे असले तरी पहिल्या वारीच्या आठवणी सुखसागरातील लाटांसारख्या आजही वारकºयांच्या मनात उचंबळत आहेत.

‘लोकमत’ने काही वारकºयांना भेटून पहिल्या वारीच्या आठवणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सोलापूर जिल्ह्यातील चिकमहूद (ता. सांगोला) येथील शंकर बंडगर म्हणाले, पहिली वारी नक्की कोणत्या वर्षी केली होती, ते आठवत नाही; पण म्हातारीसोबत आलो होतो. तिचे बोट धरून फिरलो. वाटेवरून चाललो, बºयाच अडचणी आल्या होत्या. मुक्कामापासून ते जेवणापर्यंत अडचणी होत्या; पण पहिल्याच वारीने असा काही लळा लावला की, आतापर्यंत चुकलीच नाही.

तुकाराम जाधव यांचा अनुभव जरासा वेगळा आहे. चौदा वर्षांपूर्वी ते पहिल्यांदा वारीला आले. दिंडीसोबत राहून ती वारी करायची होती; पण दिंडीत कामच अधिक सांगितले जायचे. वारीच्या आनंदापेक्षा दिंडीतील कष्टामुळे मन खचले. कशीबशी वारी उरकली; पण त्यानंतर एकट्यानेच वारी करण्याचा निर्धार त्यांनी केला. गेली चौदा वर्षे आता ते सलग येतात.

विठुमाऊलीच्या सुखसागराचा आनंद घेतात.शिवाजी केरू रणदिवे हे साठ वर्षीय गृहस्थ मंगळवेढा तालुक्यातील आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून ते पायी वारी करीत आहेत. पहिल्या वारीला गळ्यात माळ घातली. ती आयुष्यभरासाठी. पहिल्या वारीचे सुख आजही ते शोधत आहेत. या वारीने आपल्या आयुष्यात गोडी आणल्याचे भक्तिभावाने सांगतात. मिरज तालुक्यातील मौजे दिग्रज या गावचे शिवाजी कोळी हे साठ वर्षीय गृहस्थ. त्यांची ही दुसरी वारी पहिल्या वारीने विठ्ठलभेटीची आस लागली. आता वारी तोडायची नाही, असा त्यांचा संकल्प आहे, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मुकुंद संभाजी फडतरे यांची ही पहिलीच वारी आहे. वारीच्या वाटेवर आनंदाला सीमाच नाही, असे ते म्हणतात. नांदेड जिल्ह्यातील सूरजचंद  आडे (वय ६५) यांची ही पाचवी वारी आहे. तर नांदेड जिल्ह्यातील इस्लामपूरचे नारायण कदम यांची ही आठवी वारी आहे. पहिल्या वारीच्या सुखाबद्दल वर्णन करताना ते गहिवरले. वारीला पायी चालण्याच्या सुखातच माऊली भेटीच्या आतुरतेचा आनंद ते अनुभवत आहेत.

 आता वारी सोडू वाटत नाही!लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील प्रल्हाद गणपत कोरके हे ६७ वर्षांचे गृहस्थ म्हणाले, एकदा तरी वारी अनुभवावी, असे ऐकले होते. आपली ही सहावी वारी आहे. मात्र वारीचे सुख इतके आहे की, आता वारी सोडू शकत नाही, अशी मनाची अवस्था झाली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर