शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला डबल महाराष्ट्र केसरी!, चांदीची गदा, कार पटकावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 18:17 IST

उपविजेती वेदिका सासने बुलेटची मानकरी

सोलापूर : सोलापुरात रविवारी झालेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या चित्तथरारक अंतिम लढतीत कोल्हापूरच्या अमृता पुजारीने कोल्हापूरच्याच वेदिका सासनेला अस्मान दाखवत ‘डबल महाराष्ट्र केसरी’ होण्याचा मान मिळविला.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि निर्झरा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर रविवारी सायंकाळी महिला ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेची अंतिम लढत अमृता पुजारी विरुद्ध वेदिका सासने यांच्यात झाली. सुरुवातीपासून अमृता हिने आक्रमक चाल खेळत वेदिकाला कब्जात ठेवले. पहिल्या दीड मिनिटांत एकेरी पट काढत दोन गुण मिळवत आघाडी घेतली. त्यानंतर पुन्हा एकेरी पट काढून दोन गुण मिळवून पहिल्या सत्रात ५-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात वेदिकाने आक्रमक चाल खेळली परंतु अमृताने संयम दाखवत पुन्हा दोन गुण घेतले आणि विजय पक्का केला. शेवटचे दोन मिनिटे अमृताने संरक्षण करत वेदिकाला थोपवून ठेवले. ७-० अशा फरकाने अमृताने वेदिकाचा पराभव करत ‘महाराष्ट्र केसरी’चा मान मिळविला.पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते विजेत्या अमृता पुजारी हिला चांदीची गदा, रोख ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व सोनेट कारची चावी प्रदान करण्यात आली तर उपविजेत्या वेदिका सासनेला २५ हजार रुपये रोख ,स्मृतिचिन्ह आणि बुलेट बक्षीस देण्यात आली.अमृता पुजारी हिने वेदिका सासने हिच्यावर मात केल्यानंतर समर्थक महिला कुस्तीपटू यांनी अमृता पुजारी आणि प्रशिक्षक दादासोा लवटे यांना खांद्यावर घेऊन कुस्तीच्या मैदानामधून हलगीच्या कडकडाटात मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला. यावेळी फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली.यावेळी महापौर विनायक कोंड्याल, हिंदकेसरी योगेश दोडके, आयोजक स्वाती अळळीमोरे-साखरे, अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मेनजयराजे भोसले, ट्रिपल महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फड, महाराष्ट्र केसरी मुन्नालाल शेख, समाधान घोडके, उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले, मौला शेख, उमेश सूळ, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, सभागृहनेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जि.प. उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, रमेश बारसकर, सागर कल्याणशेट्टी, पैलवान लोखंडे, उद्योजक सागर कत्ते, प्रकाश वानकर, सुधा अळळीमोरे, योगेश बोंबाळे, श्रीदेवी फुलारे, युवराज सरवदे, यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. या संपूर्ण कुस्ती स्पर्धेचे युवराज केचे यांनी सूत्रसंचालन केले.

महिला कुस्ती स्पर्धेसाठी ५० लाख रुपये देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देणार : गोरेपुरुष कुस्ती स्पर्धेसाठी राज्य शासन एक कोटी रुपयांचा निधी देते. परंतु महिला कुस्तीसाठी कोणतीही तरतूद नाही. पुढील वर्षीपासून महिला कुस्ती स्पर्धेसाठी राज्य शासनाने ५० लाख रुपये द्यावेत, असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाषणात सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur's Amruta Pujari Wins Double Maharashtra Kesari Title!

Web Summary : Amruta Pujari of Kolhapur defeated Vedika Sasane to win the 'Double Maharashtra Kesari' title in Solapur. She received a silver mace and a car. The runner-up got a bullet bike. A proposal for 5 million rupees for women's wrestling will be sent to the CM.