सोलापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा पुतळा जाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 02:41 PM2019-11-23T14:41:25+5:302019-11-23T14:42:02+5:30

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांविरोधात घोषणाबाजी केली आहे. अजित पवार मुर्दाबाद अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत.

Ajit Pawar's statue burned by NCP workers in Solapur | सोलापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा पुतळा जाळला

सोलापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा पुतळा जाळला

Next

सोलापूर - अजित पवार यांच्या भूमिकेवरुन शहर आणि जिल्हा राष्ट्रवादी फूट अटळ दिसत आहे. राष्ट्रवादीच्या शहरातील कार्यकर्त्यांनी शनिवारी दीड वाजण्याच्या सुमाराला हुतात्मा चौकात अजित पवार यांच्या पुतळ््याचे दहन केले.

अजित पवार यांनी शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. अंधारात जाउन त्यांनी भाजपच्या नेत्यांसोबत बोलणी केली. महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हे सहन करणार नाही. अजित पवार गद्दार आहेत. त्यांनी बारामतीमधून पुन्हा निवडून लढवून दाखवावी. त्यांचे डिपॉझिट जप्त होईल,  अशी टीकाही यावेळी करण्यात आली.  यावेळी शंतनु साळुंखे, प्रशांत बाबर, दीपक राजगे, चंद्रकांत पाटील, लखन गावडे, बिरप्पा बंडगर यावेळी उपस्थित होते. 

शरद पवारांना अंधारात ठेवून अजित पवार यांनी शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या संदर्भात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी आमदारांना फसवून राजभवनात नेले असल्याचे सांगितले. त्यानंतर आधीच संतप्त झालेले कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले. या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाबाहेर अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा देत त्यांच्या प्रतिमेला जोड्याने मारले. तसेच, त्यांच्या प्रतिमेला काळे फासून ती जाळण्याचाही प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांविरोधात घोषणाबाजी केली आहे. अजित पवार मुर्दाबाद अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे व्हाय. बी सेंटरमध्ये दाखल झाले असून थोड्याच वेळात पत्रकार परिषदेतून आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात फूट पडल्याचं आता स्पष्ट झालं आहे. भाजपाने थेट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनाच सोबत घेत सत्ता स्थापन केली आहे. 

Web Title: Ajit Pawar's statue burned by NCP workers in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.