वय ५० वर्षे...८ जिल्हे...६०० गुन्हे...१५ वर्षे तुरूंगात तरीही चोरी हाच त्याचा धंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 01:17 PM2020-03-12T13:17:29+5:302020-03-12T13:19:41+5:30

वयाच्या १५ व्या वर्षी केला पहिला गुन्हा; चोरीचे सोने विकून ३५ एकरांपेक्षा जास्त जमीन खरेदी

Age 5 years ... 2 Districts ... 2 Crimes ... 2 years In prison, theft is his profession. | वय ५० वर्षे...८ जिल्हे...६०० गुन्हे...१५ वर्षे तुरूंगात तरीही चोरी हाच त्याचा धंदा

वय ५० वर्षे...८ जिल्हे...६०० गुन्हे...१५ वर्षे तुरूंगात तरीही चोरी हाच त्याचा धंदा

googlenewsNext
ठळक मुद्देदोन अट्टल गुन्हेगारांना फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने अटक केली दोघांकडून एक किलो सोने, चांदीचे साहित्य, रोख रक्कम, दोन मोटर कार, एक मोटरसायकल व तीन मोबाईल असा एकूण ५५ लाख ५७ हजार ९२० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत

सोलापूर : महाराष्टÑात ठिकठिकाणी बँक व घरफोड्या करणाºया दोन अट्टल गुन्हेगारांना फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने अटक केली आहे. दोघांकडून एक किलो सोने, चांदीचे साहित्य, रोख रक्कम, दोन मोटर कार, एक मोटरसायकल व तीन मोबाईल असा एकूण ५५ लाख ५७ हजार ९२० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

राजेंद्र शिवाजी बाबर (रा. किकली, ता. वाई, जि. सातारा मूळगाव आसनगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा सध्या सोजर इंग्लिश स्कूलच्या मागे परांडा रोड, बार्शी, जि. सोलापूर), राजकुमार पंडित विभूते (वय ३८, रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जबरी चोरी व घरफोडी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गुन्हेगारांच्या हालचाली पडताळण्याचे काम सुरू होते. दरम्यान,  पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद व अहमदनगर आदी जिल्ह्यांत सुमारे ६०० दरोडे व जबरी चोरी करणारा नामचिन गुन्हेगार राजेंद्र बाबर हा पोलिसांच्या रडारवर होता.

केगाव येथील जयभवानी हॉटेल परिसरात चोरीतील दोघे वावरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांना मिळाली होती. माहितीवरून केगाव येथील जयभवानी हॉटेल परिसरात सापळा लावण्यात आला होता. राजेंद्र बाबर व राजकुमार विभूते हे दोघे पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पकडण्यात आले. दोघांच्या ताब्यातील दोन कार, दरोडा, घरफोडी, जबरी चोरी करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य मिळून आले. सोलापुरात फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. 

साताºयात फोडली होती आयडीबीआय बँक 

  • - दि. २४ व २५ जानेवारी रोजीच्या रात्री तिघांनी आधुनिक कटावणीच्या साह्याने सातारा येथील बँक फोडून आतील तारणापोटी असलेले ७९ लाख ९२ हजार रुपये किमतीचे २ किलो ६४० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले होते. सातारा जिल्ह्यात या बँकफोडीमुळे खळबळ उडाली होती. राजेंद्र शिवाजी बाबर, महेश शिवाजी बाबर, राजकुमार पंडित विभूते या तिघांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
  • - शिवाजी बाबर याने कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मोक्का) कारंबा जेल, कोल्हापूर येथून सप्टेंबर २०१९ मध्ये अटकेतून सुटल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद घराची घरफोडी केली होती. गेटमधील कार चोरल्याची माहिती दिली. राजकुमार विभूते याच्यावर सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली येथील गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती उजेडात आली आहे. 

यांनी बजावली कामगिरी
- ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त कमलाकर ताकवले, पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, दुय्यम पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ देशमाने, पोलीस हेडकॉन्स्टेबल आबा थोरात, अविनाश शिंदे, पोलीस नाईक तिमिर गायकवाड, दीपक डोके, प्रकाश राठोड, योगेश बरडे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल यादव, राजकुमार वाघमारे, धनाजी बाबर, दिलीप विधाते, गणेश शिर्के, लक्ष्मीकांत फुटाणे, समाधान मारकड, अभिजीत पवार, विनोद बनसोडे, कुंदन खटके, शशिकांत धेंडे, राजू मुदगल यांनी पार पाडली. 

Web Title: Age 5 years ... 2 Districts ... 2 Crimes ... 2 years In prison, theft is his profession.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.