सोलापुरात डीजेवरील कारवाईनंतर आता डिजीटल फ्लेक्सवरही संक्रात; पोलीस आयुक्तांचा दुसरा दणका 

By विलास जळकोटकर | Published: February 17, 2024 06:37 PM2024-02-17T18:37:40+5:302024-02-17T18:37:51+5:30

नूतन पोलीस आयुक्त एम राज कुमार यांच्याकडे शहरवासीयांनी केलेल्या तक्रारीमुळे ही कारवाई होत असल्याचे सांगण्यात आले.

After the action against DJ in Solapur, Sankrat now also on digital flex Police commissioner's second blow | सोलापुरात डीजेवरील कारवाईनंतर आता डिजीटल फ्लेक्सवरही संक्रात; पोलीस आयुक्तांचा दुसरा दणका 

सोलापुरात डीजेवरील कारवाईनंतर आता डिजीटल फ्लेक्सवरही संक्रात; पोलीस आयुक्तांचा दुसरा दणका 

सोलापूर: उत्सवकाळात कर्णकर्कश डीजेच्या आवाजाची मर्यादा ओलांडल्याने सोलापुरात तब्बल २४ मंडळांवर अध्यक्ष, डीजेचालक, वाहनमालकांवरील कारवाईनंतर शनिवारी सायंकाळी गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसाननी डीजे हटाव मोहीम हाती घेतली. नूतन पोलीस आयुक्त एम राज कुमार यांच्याकडे शहरवासीयांनी केलेल्या तक्रारीमुळे ही कारवाई होत असल्याचे सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध भागामध्ये विविध ठिकाणी संस्था, संघटना, मंडळांनी डिजिटल बोर्ड, फ्लेक्स मोठ्या प्रमाणावर लावले आहेत. शनिवारी सायंकाळी पोलीस संरक्षणांमध्ये हे फ्लेक्स उतरण्याचे मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये जोरात सुरू झाले आहे. ही कारवाई कायमस्वरूपी रहावी अशी अपेक्षा शहरवासीयांनी व्यक्त केली.

शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौक, ते छत्रपती संभाजी राजे चौक, सरस्वती चौक, मेकॅनिक चौक पासून बाळे,जुळे सोलापूर अशा अनेक ठिकाणी विविध शिवजन्मोत्सव मंडळांनी डिजिटल बोर्ड लावून शुभेच्छा दिल्या आहेत. नूतन पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी शहरातील काही नागरिकांनी आणि संस्थांनी दिलेल्या निवेदनावर सदरील कार्यवाही केली आहे. परंतु या कामगिरीमध्ये सातत्य रहावे, अशीही अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.

Web Title: After the action against DJ in Solapur, Sankrat now also on digital flex Police commissioner's second blow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.