शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
3
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
4
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
5
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
6
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
7
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
8
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
9
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
10
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
11
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
12
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
13
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
14
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
15
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
16
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
17
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
18
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
19
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
20
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू

अबब..बार्शी तालुक्यात १२ तासात पडला तब्बल १४० मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 12:18 PM

पन्नास वर्षातील विक्रम मोडीत; शेतकºयांच्या शेतीपिकांचे नुकसान

ठळक मुद्देबार्शी शहराचे हार्ट असलेल्या पांडे चौकात देखील  तीन फूट पाणी साचले होतेया पावसामुळे तालुक्यातील शेतकºयांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहेशहरात पडलेल्या पावसामुळे व्यापारी व नागरिकांचे देखील नुकसान झाले

बार्शी: बार्शी तालुक्यात गेल्या पन्नास वर्षात चोवीस तासात पडलेल्या पावसाचे सर्व विक्रम आजच्या पावसाने मोडीत काढले आहेत. बुधवारी पहाटे ३ ते दुपारी ३ या बारा तासात  शहर व तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. तालुक्यातील दहाही महसुली मंडळात सरासरी दीडशे मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. तालुक्यात एकूण सरासरी १४०़४ मिमी एवढा पाऊस पडला आहे. 

या पावसामुळे तालुक्यातील शेतकºयांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शहरात पडलेल्या पावसामुळे व्यापारी व नागरिकांचे देखील नुकसान झाले आहे. हा पाऊस एवढा भयावह होता की कोणालाच दिवसभर घराच्या बाहेर देखील पडता आले नाही. हा पाऊस सुरू असतानाच विविध ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले. बार्शी शहराचे हार्ट असलेल्या पांडे चौकात देखील  तीन फूट पाणी साचले होते.

या भागात घुसले होते पाणी...बार्शीत सलग दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे १४ आॅक्टोबर २०२० रोजी बार्शी शहरातील रामेश्वर झोपडपट्टी, सोलापूर रोड दोन्ही बाजूची काँक्रेट रस्त्याकडेची घरे, ४२२ बारंगुळे प्लॉट , एकविराई मंदिर परीसर ,बारंगुळे गल्ली भगवंत मैदान परिसर  त्याचबरोबर मध्यवर्ती बाजारपेठ परिसरातील काही घरे दुकाने यासह विविध भागात  पावसाचे गटारीतून लेंडीनाल्यातून वाहणारे पावसाचे पाणी जाऊन लोकांची अपरिमित हानी झालेली आहे. दैनंदिन गृहोपयोगी वस्तु तसेच घरे दुकाने यातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ नगरपरिषदेच्या शॉपिंग सेंटर तळमजल्यावर असणारी सर्व दुकाने पाण्याखाली आली आहेत़ चौधरी नामक व्यक्ती तुळजापूर रोड नाल्या त वाहुन गेलेला आहे आगळगाव रोड वस्ताद हॉटेल ओढ्याच्या पाण्याच्या प्रवहामुळे डिव्हायडर अंगावर पडून शिवशंकर नामक सायकलस्वार गंभीर जखमी झालेला आहे़ अलीपुर रोड परिसरात घरांची पडझड झालेली आहे .तसेच सोमवार पेठ भागात काही दुकान आणि घरांची पडझड झालेली आहे़ ऐनापूर रोड टाकणखार रोड भागातील व्यापारी   गोदामे आणि दुकानात पाणी घुसले आहे त्यामूळे मोट्या प्रमाणात नुकसान झाले आहे.----------बार्शी तालुका मंडळ निहाय पडलेला पाऊस

  • बार्शी-  158
  • अगळगाव-  65
  • वैराग-  168
  • पानगाव- 165
  • सुर्डी-   149
  • गौडगाव-  155
  • पांगरी-  122
  • नारी-   160
  • उपळे दु.-  110
  • खांडवी-  152
  • एकुण पाऊस -    1404   मि. मि.
  • सरासरी पाऊस -   140.4 मि. मि.
टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसbarshi-acबार्शीfloodपूर