शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकराचे सूचक विधान
2
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
3
हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात
4
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?
5
७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला...  
6
लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश
7
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
8
"मला इलॉन मस्कची गरज," आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अचानक का बॅकफूटवर आले डोनाल्ड ट्रम्प?
9
Video : माणुसकीला काळीमा! कॅन्सरग्रस्त आजीला नातेवाईकांनी रस्त्यावर सोडले; व्हिडीओ व्हायरल
10
१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी
11
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
12
मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?
13
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
14
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
15
Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!
16
श्रावणात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
17
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
18
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
19
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
20
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?

 तरुणाने कॉलेजवरून उडी मारून संपवलं जीवन; खिशातील चिठ्ठीतून धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 15:53 IST

आई-वडिलांनी कॉलेजमध्ये जाऊन शोध घेतल्यावर त्यांना नवीन इमारतीवरून कोणीतरी पडल्याची माहिती मिळाली.

Solapur Student Suicide : दयानंद कॉलेजमधील नवीन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थ्याने आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी सायंकाळी ४:२० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. कॉलेजमध्ये असाइनमेंट देण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मोबाइल स्विच ऑफ लागल्याने आई-वडिलांनी शोध घेतला. प्रीतम नीलेश राऊत (वय २२, रा. सोलापूर सहकारी बँकेच्या वरच्या मजल्यावर, टिळक चौक, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रीतम हा डी.बी.एफ. दयानंद महाविद्यालयात एमकॉमच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याचवेळी सावरकर मैदानासमोरील एका कॉम्प्युटर सेंटरमध्ये नोकरी करीत होता. सोमवारी सकाळी तो तयार झाला आणि आईला कॉलेजमध्ये असाइनमेंट द्यायची आहे, असे सांगून घरातून बाहेर पडला. तो सायकलवर कॉलेजमध्ये गेला. दुपारी त्याचे वडील घरी आले, त्यांनी पत्नीला मुलगा प्रीतम कोठे गेला? अशी विचारणा केली. कॉलेजला गेल्याचे सांगितल्यावर त्यांनी मोबाइलवरून संपर्क साधला. मात्र तो स्विच ऑफ लागला. वडिलांना चिंता वाटल्यांनी ते कॉम्प्युटर सेंटरच्या ठिकाणी गेले. तेथेही आला नसल्याचे सांगण्यात आले.

आई-वडिलांनी कॉलेजमध्ये जाऊन शोध घेतल्यावर त्यांना नवीन इमारतीवरून कोणीतरी पडल्याची माहिती मिळाली. दोघेही घटनास्थळाकडे गेले असता, त्या ठिकाणी त्यांचा मुलगा प्रीतम असल्याचे आढळून आले.

'आय वॉन्ट फ्रीडम...' असा उल्लेख असलेली चिठ्ठी सापडलीप्रीतम राऊत याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्याजवळ एक चिठ्ठी आढळून आली. चिठ्ठीमध्ये त्याने माझ्या कृत्याला मी स्वतः जबाबदार आहे. मी जी काही पैशाची उसनवारी केली आहे, ती त्यांना परत करावी. मी माझ्या आई- वडिलांची, नातेवाईकांची व मित्रांची माफी मागतो. आय वॉन्ट फ्रिडम... अशा आशयाची चिठ्ठी पोलिसांना मिळाल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी दिली.

प्रीतम-प्रतीक जुळे भाऊप्रीतम याच्या पश्चात आई, वडील व एक जुळा भाऊ प्रतीक असा परिवार आहे. त्याचे वडील नीलेश हे विकास बँकेत शिपाई म्हणून काम करतात. आई गृहिणी असून भाऊ प्रतिक हा बीए-३ या वर्गात शिकत आहे.

पगार कमी असताना सांगितला जास्तप्रीतम हा एका कॉम्प्युटरमध्ये कामाला होता. त्या ठिकाणी तो १३ हजार रुपये पगार आहे, असे आईवडिलांना सांगत होता. मात्र पगार वेळेवर होत नाही, असे तो वडिलांना सांगत असे. मी तुला महिन्याला १३ हजार देतो नाराज होऊ नको म्हणून वडिलांनी प्रत्येक महिन्याला तीन महिने १३ हजार रुपये दिले होते. मात्र त्याला प्रत्यक्षात फक्त पाच हजार पगार होतो हे नंतर समजल्याचे वडील नीलेश यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थी