नीरा खोऱ्यातील धरणांत ५५ टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीपेक्षा २० टक्के साठा कमी

By काशिनाथ वाघमारे | Published: February 9, 2024 05:15 PM2024-02-09T17:15:44+5:302024-02-09T17:18:09+5:30

काशिनाथ वाघमारे, सोलापूर : सातारा, पुणे, सोलापुर जिल्हासाठी वदरदायिनी ठरलेल्या नीरा खो-यातील धरणात पाणी साठा कमी होत असल्याने शेतकरी ...

55 percent water storage in dams in Neera valley; 20 percent less stock than last year | नीरा खोऱ्यातील धरणांत ५५ टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीपेक्षा २० टक्के साठा कमी

नीरा खोऱ्यातील धरणांत ५५ टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीपेक्षा २० टक्के साठा कमी

काशिनाथ वाघमारे, सोलापूर: सातारा, पुणे, सोलापुर जिल्हासाठी वदरदायिनी ठरलेल्या नीरा खो-यातील धरणात पाणी साठा कमी होत असल्याने शेतकरी धास्तावला आहे. नीरा खोऱ्यातील धरणांत ५५ टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षीपेक्षा २० टक्के साठा कमी झाला आहे. उन्हाळ्यात पिकाबरोबर जनावरांना कसं जगवायचं ? असा प्रश्न उभा टाकला आहे. नीरा-देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी धरण परिसरात जून २०२२ मध्ये पाऊस लवकर पडला नव्हता. या हंगामात समाधानकारक पाऊस न पडल्याने, परतीचा पाठ फिरवल्याने खरीप पिकांना धरणातील पाणी द्यावे लागले. नीरा खो-यातील चार धरणांत बुधवार अखेर गतवर्षापेक्षा सरासरी २० टक्क्यांनी पाणीसाठा कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

४८ हजार ३२९ दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या नीरा खो-यातील चारही धरणात एकूण २६ हजार ६७६ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच ५५.२० टक्के उपलब्ध आहे. गतवर्षी ३६ हजार १४४ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात ७४.७९ टक्के उपलब्ध होता. त्यामुळे गतवर्षी जून महिन्यापर्यंत दोन्ही कालव्यातून नियमित विसर्ग सोडण्यात आले. यावर्षी या चार धरणात आज ५५,२० टक्के पाणीसाठा आहे. याचा परिणाम रब्बी व उन्हाळी हंगामाच्या पिकांना द्यावयाच्या पाण्यावर होणार आहे. त्यामुळे यावर्षी नीरा डावा व उजवा कालव्यातून पाणी द्यावे लागले.

नीरा खोऱ्यातील पाणीसाठा (७ फेब्रुवारी अखेर)

  • निरा देवघर - ४६:६८
  • भाटकघर - ५९.५१ टक्के
  • वीर - ४८.२६ टक्के
  • गूंजवणी - ७२.५२ टक्के

Web Title: 55 percent water storage in dams in Neera valley; 20 percent less stock than last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.