शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

गळलेल्या गारपीटग्रस्तांसाठी १६ कोटींची मागणी

By admin | Updated: June 12, 2014 00:58 IST

गारपीट अनुदान : तिसऱ्या टप्प्याचे वाटप संथगतीने

सोलापूर: गारपीट नुकसान अनुदानाच्या यादीतून गळलेल्या शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने १५ कोटी ९४ लाख इतक्या अतिरिक्त निधीची मागणी केली आहे. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यात वाटपासाठी आलेली रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे.१६ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत झालेल्या गारपीटमध्ये जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे झाले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे ३०५ कोटी २७ लाख २९ हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम शासनाने तीन टप्प्यात दिली आहे. पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्याला ६३ कोटी ६० लाख, दुसऱ्या टप्प्यात १७१ कोटी तर तिसऱ्या टप्प्यात ७० कोटी ६६ लाख ५४ हजार रुपये देण्यात आले आहेत. पहिल्या दोन टप्प्यांची रक्कम तहसील कार्यालयामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली होती. काही रक्कम शेतकऱ्यांची बँक खाती नसल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पडून आहे. तिसऱ्या टप्प्याची ७० कोटी ६६ लाख ५४ हजारांची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाने २१ मे रोजी तहसील कार्यालयांना वितरित केली आहे. ही रक्कम काही तहसील कार्यालयांनी बँकांकडे जमा केली आहे. परंतु काही तहसील कार्यालयांनी अद्याप ही रक्कम जमाच केली नाही. तहसील कार्यालयात तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम संथगतीने सुरू आहे. ते किती दिवस चालेल हे सांगता येत नाही, अशा पद्धतीने काम सुरू आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात आले. त्यापूर्वी शेतकऱ्यांना याद्याच पहावयाला मिळाल्या नाहीत. त्यामुळे कोणाचे नाव आहे अन् कोणाचे नाही हे शेतकऱ्यांना समजलेच नाही. नुकसानीच्या यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांनी नंतर आंदोलन, उपोषण, निवेदने दिली. जिल्हाधिकाऱ्यांना मदतीतून वगळलेल्या शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या निधीची रक्कम कळविण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या होत्या. त्यानुसार सात तहसीलदारांनी १५ कोटी ९४ लाख इतकी मागणी केली असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे निधीची मागणी केली आहे.---------------------------------------मोहोळने केली १० कोटींची मागणीपंचनामे झाले परंतु मदतीच्या पात्र यादीत नावे आली नसल्याच्या तक्रारी असलेल्यांसाठी १५ कोटी ९४ लाखांची मागणी केली आहे. त्यामध्ये मोहोळ १० कोटी, बार्शी एक कोटी ९६ लाख, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा प्रत्येकी एक कोटी, पंढरपूर एक कोटी ५ लाख, करमाळा ८५ लाख ९७ हजार, सांगोला ८ लाख रुपये. उत्तर तालुक्यातील ७०० शेतकऱ्यांसाठी एक कोटीची मागणी केली असल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगितले जात असले तरी त्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात नाही.--------------------------------------जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला जुमानेनातगारपीट नुकसानीची दुसऱ्या टप्प्याची रक्कम लोकसभा मतदानाअगोदर १५ एप्रिलपूर्वी बँकांना पाठवली होती. त्यानंतर सव्वा महिन्याच्या फरकाने तिसऱ्या टप्प्याची रक्कम आली. ती रक्कम तहसीलदारांकडे देऊन २१ दिवस उलटले आहेत. ३१ मेपर्यंत ही रक्कम वाटप करण्याचे आदेश असताना उत्तर तालुक्यात आजही याद्याच करण्याचे काम सुरू आहे. याच आदेशाला जुमानले जात नसल्याने दुष्काळी निधी कधी जमा होणार, असा प्रश्न किमान उत्तर तालुक्याबाबत तरी सुरू आहे. -----------------------------------