सोलापूरजवळ तेलंगणाच्या बसला भीषण अपघात, 15 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 09:16 IST2019-06-07T09:13:49+5:302019-06-07T09:16:18+5:30

सोलापूर-पुणे महामार्गावरील सोलापूर विद्यापीठाजवळ तेलंगणाच्या बसला भीषण अपघात झाला आहे. एसटी बस व बॅटरीने भरलेल्या ट्रकचा अपघात झाला.

15 injured in Telangana bus accident near Solapur | सोलापूरजवळ तेलंगणाच्या बसला भीषण अपघात, 15 जण जखमी

सोलापूरजवळ तेलंगणाच्या बसला भीषण अपघात, 15 जण जखमी

ठळक मुद्देसोलापूर-पुणे महामार्गावरील सोलापूर विद्यापीठाजवळ तेलंगणाच्या बसला भीषण अपघात झाला आहे.अपघातात पंधरा जण जखमी झाले असून, पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सोलापूर - सोलापूर-पुणे महामार्गावरील सोलापूर विद्यापीठाजवळ तेलंगणाच्या बसला भीषण अपघात झाला आहे. एसटी बस व बॅटरीने भरलेल्या ट्रकचा अपघात झाला. या अपघातात पंधरा जण जखमी झाले असून, पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अपघात झालेली बस ही हैदराबादकडून पंढरपूरकडे जात होती. बॅटरीने भरलेल्या ट्रकवर मागून आदळल्याने या बसने पेट घेतला. जखमीपैंकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. बसच्या चालक आणि वाहकावर शासकीय रुग्णालयात उपचार सूरू आहेत. तर 9 जणांना अश्विनी सहकारी रुग्णालयात आणि एकाला मार्कंडेय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

जखमींची नावे

1. अस्लम महेबूब सलगर (वय 27, रा. चारमिनार, हैदराबाद)

2. अजमेर रामय्या भिक्कु (वय 32, रा. हैदराबाद)

3. यादय्या रामलू गोपीन (वय 47, रा. रवी चेडू केसम पेठ, महेबूब अपार्टमेंट, हैदराबाद)

4. रणधीरसिंग मनोहरसिंग दीक्षित ( वय 48, रा. वायएमसीए नारायण गुडा, हैदराबाद)

5. अस्लम सय्यद (वय 35, रा. तलाफ कट्टा, हैदराबाद)

6. नारायणसिंग राजपूत (रा. बीएचईएल, हैदराबाद)

7. मीना राजपूत

 

Web Title: 15 injured in Telangana bus accident near Solapur