"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 01:00 IST2025-07-05T00:58:13+5:302025-07-05T01:00:26+5:30
खरे तर, पतीच्या काही सवयींना कंटाळलेल्या एका पत्नीने आपल्या पतीला थेट घटस्फोट पत्रच लिहिले आहे. हे पत्र सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल
आपण पती-पत्नी यांच्यातील वादासंदर्भात रोज ऐकतो अथवा वाचतो. मात्र, प्रकरण जेव्हा घटस्फोटापर्यंत पोहोचते तेव्हा स्थिती जरा गंभीर होते. साधारणपणे पती-पत्नी यांच्यातील घटस्फोटाचे कारण, घरगुती हिंसाचार, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक वाद अथवा विवाहबाह्य संबंध असते असतात. मात्रा, आता एक अजबज प्रकरण समोर आले आहे. जे वाचून तुम्हीही कपाळाला हात माराल.
खरे तर, पतीच्या काही सवयींना कंटाळलेल्या एका पत्नीने आपल्या पतीला थेट घटस्फोट पत्रच लिहिले आहे. हे पत्र सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात, पत्नीने घटस्फोटासाठी जी कारणे सांगितली आहेत, ती वाचून तुम्हाला आधी हसायला येईल आणि नंतर, तुम्हीच विचार करू लागाल की, हीदेखील घटस्फोटाचे कारणे असू शकतात? हे घटस्फोट पत्र वाचून अनेक युजर्स आश्चर्य व्यक्त करत आहेत.
एकाच अंडरवेअरपासून ते टॉयलेट फ्लशपर्यंत... -
या घटस्फोट पत्रात पत्नी म्हणते, "डिअर अंकित, "डियर" तर तू डिझर्व्ह करत नाहीस. मी तुला कंटाळली आहे. आता आणखी सहन होऊ शकत नाही. मी या लग्नात सर्व्हाइव्ह करू शकत नाही. तू आंघोळ करत नाहीस, तीन-तीन दिस एकच अंडरवेअर (अंतर्वस्त्र) परिधान करतोस. ज्या दिवशी चुकून आंघोळ करतोस, त्या दिवशी टॉवेल बेडवच टाकून देतोस, पैशांची तर अजिबात किंमत नाही, तू ८० हजारांचा नथिंग फोन घेतलास. त्याचे नावच नथिंग, तो काय फीचर्स देणार. तुझ्याकडून तर फ्लशही होत नाही. 'गोबरबुद्धी'! माझा वकील तुला घटस्फोटाचे कागदपत्रे पाठवेल. गुड बाय"
युजर्सच्या कमेंट्स -
हे डायव्हर्स लेटर सोशल मीडियाच्या विविध हँडल्सवरून व्हायरल होत आहे. हे लेटर आतापरर्यंत हजारो लाकंनी बघितले आहे. यावर युजर्स गमतीशीर कमेंटदेखील करत आहेत. एकाने लिहिले, हँडरायटिंग तर फारच छान आहे. एकाने लिहिले, ब्रँड प्रमोशनची पद्धत थोडी कॅज्युअल आहे. कृपया थोडी लाज वाटू द्या.