नेमकी काय आहे कॉकरोच जनता पार्टी? ७२ तासात ७० हजार मेंबर झाल्याचा दावा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 16:02 IST2026-05-19T16:01:13+5:302026-05-19T16:02:03+5:30

Cockroach Janata Party : 'कॉकरोच जनता पार्टी'ची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. पण अनेकांना अजूनही प्रश्न आहे की हे नेमकं काय? तेच जाणून घ्या.

What exactly is Cockroach Janata Party? Claims to have 70,000 members in 72 hours | नेमकी काय आहे कॉकरोच जनता पार्टी? ७२ तासात ७० हजार मेंबर झाल्याचा दावा...

नेमकी काय आहे कॉकरोच जनता पार्टी? ७२ तासात ७० हजार मेंबर झाल्याचा दावा...

Cockroach Janata Party : सोशल मीडियावर सध्या “कॉकरोच जनता पार्टी” नावाची एक भन्नाट ‘राजकीय पार्टी’ जोरदार चर्चेत आहे. सुरुवातीला लोकांनी याला गंमत समजलं, पण काही दिवसांतच हा विषय इंटरनेटवर ट्रेंड होऊ लागला. ही संकल्पना बेरोजगारीवरील एका वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादातून समोर आली. त्यानंतर आम आदमी पार्टीचे माजी सोशल मीडिया कार्यकर्ता अभिजीत दिपके यांनी व्यंगात्मक पद्धतीने “कॉकरोच जनता पार्टी”ची कल्पना मांडली.  

काय आहे कॉकरोज जनता पार्टी? 

पार्टीसंबंधी लोक सांगतात की, हा अशा लोकांचा आवाज ज्यांच्याकडे सिस्टीम दुर्लक्ष करते. या पार्टीच्या वेबसाइटवरही याला एक व्यासपीठ म्हणून सादर केलं आहे. पार्टीचं घोषवाक्यही लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत. या पार्टीचे पोस्ट, घोषणापत्र आणि सदस्य नोंदणी मोहिम सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. काही अहवालांनुसार, अवघ्या तीन दिवसांत 70 हजारांहून अधिक लोक या मोहिमेशी जोडले गेले. पार्टीचा दावा आहे की ही व्यवस्था दुर्लक्षित करत असलेल्या लोकांचा आवाज आहे. त्यांच्या घोषणापत्रात महिलांसाठी 50 टक्के आरक्षण, मीडिया निष्पक्षता आणि पक्षांतरावर कठोर नियम यांसारखे मुद्दे मांडण्यात आले आहेत.


तृणमूल काँग्रेसच्या Mahua Moitra आणि Kirti Azad यांची नावंही या चर्चेत आली. सोशल मीडियावर या पार्टीवरून मोठ्या प्रमाणात मीम्स आणि विनोदी पोस्ट व्हायरल होत आहेत. काही लोक याला फक्त मजेशीर ट्रेंड मानत आहेत, तर काहींच्या मते हा तरुणांच्या नाराजीचा नवा डिजिटल आंदोलनाचा प्रकार आहे.  


सोशल मीडियावर लोकांच्या याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक याला केवळ मनोरंजन मानत आहेत, तर काही लोक म्हणाले की, ही तरूणांची नाराजी व्यक्त करण्याची नवीन पद्धत आहे. एका यूजरने लिहिलं की, कधी कधी गंमतीने बोलली गेलेली गोष्टही मोठ्या वादाचं कारण ठरते. तर एकाने लिहिलं की, इंटरनेटच्या जमान्यात काहीही रातोरात आंदोलन बनू शकतं. सध्या कॉकरोच जनता पार्टी इंटरनेटच्या विश्वात चांगलीच गाजत आहे. आता हे केवळ सोशल मीडियापुरतं मर्यादित राहतं की, यात पुढे काही नवीन वळण येईल हे बघावं लागेल.

Web Title : कॉकरोच जनता पार्टी: व्यंग्य आंदोलन ने खींचा ध्यान, ऑनलाइन बहस शुरू।

Web Summary : कॉकरोच जनता पार्टी, एक व्यंग्य राजनीतिक आंदोलन, ने सोशल मीडिया पर महत्वपूर्ण ध्यान खींचा है। बेरोजगारी पर एक बहस से जन्मी, पार्टी अनसुनी आवाजों का प्रतिनिधित्व करने, महिलाओं के अधिकारों और मीडिया निष्पक्षता की वकालत करने का दावा करती है। इसने 72 घंटों में 70,000 सदस्य बटोरे, जिससे युवाओं की असंतोष और डिजिटल सक्रियता के बारे में चर्चा शुरू हो गई।

Web Title : Cockroach Janata Party: Satirical movement gains traction, sparks debate online.

Web Summary : The Cockroach Janata Party, a satirical political movement, has gained significant traction on social media. Born from a unemployment debate, the party claims to represent the unheard voices, advocating for women's rights and media impartiality. It garnered 70,000 members in 72 hours, sparking discussions about youth dissatisfaction and digital activism.