आरारारारा खतरनाक! स्टेजवर नवरी-नवरदेवासोबत 'त्याने' केलं असं काही, म्हणाल -हा तर साउथचा हिरो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 18:04 IST2021-08-19T17:59:44+5:302021-08-19T18:04:38+5:30
लग्नाचा एक असाच मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल.

आरारारारा खतरनाक! स्टेजवर नवरी-नवरदेवासोबत 'त्याने' केलं असं काही, म्हणाल -हा तर साउथचा हिरो!
सोशल मीडियावरलग्नाचे अनेक मजेदार व्हिडीओ शेअर होत असतात. यातील काही इतके गमतीदार असतात की पुन्हा पुन्हा बघण्याचं मन होतं. तर काही व्हिडीओ हैराण करून सोडणारे असतात. इतकंच नाही तर या व्हिडीओची यूजर्स चांगलीच मजा घेतात. अशात लग्नाचा एक असाच मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्ही नक्कीच म्हणाल - आरारारारा खतरनाक.
लग्नाचं वातावरण असेल आणि त्या मजा-मस्ती नसेल असं होऊच शकत नाही. अनेक नवरी-नवरदेव आपलं लग्न खास करण्यासाठी असं काही करतात जे बघून लोक थक्क होतात. तर अनेकदा मित्र-मैत्रिणी लग्नात जान आणतात. या व्हिडीओत तुम्हाला असंच काही बघायला मिळतं. यात स्टेजवर एका व्यक्तीने असं काही केलं की, सगळेच हैराण झाले. (हे पण वाचा : VIDEO : लग्नाचा रिवाज पार पाडता पाडता संतापली नवरी, लोक म्हणाले - जबरदस्ती लावलं तिचं लग्न...)
व्हिडीओ पाहिल्यावर नक्कीच तुम्हाला हसू आवरत नसेल. व्हिडीओमध्ये ज्याप्रकारे नवरी-नवरदेवाची गंमत केली ते बघून दोघांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. इन्स्टाग्रामवर 'trending_wedding_couples' नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक भरभरून या व्हिडीओ कमेंट्स करत आहेत.