VIDEO : स्टेजवर डान्स करता करता पडले नवरी-नवरदेव आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 03:10 PM2021-07-29T15:10:55+5:302021-07-29T15:12:06+5:30

सोशल मीडियावर एक संगीत सेरेमनीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात नवरी-नवरदेव डान्स करताना दिसत आहेत.

Wedding video : Groom and bride falling on stage video goes viral on internet | VIDEO : स्टेजवर डान्स करता करता पडले नवरी-नवरदेव आणि मग...

VIDEO : स्टेजवर डान्स करता करता पडले नवरी-नवरदेव आणि मग...

Next

लग्न समारंभात नवरी आणि नवरदेव लाइमलाईटमध्ये असतात. दोघेही आपल्या अंदाजाने लोकांचं मन जिंकतात. लग्नात डान्सशिवाय मजा येत नाही. आजकाल तर नवरी-नवरदेव डान्स शिकून प्रॉपर डान्स सादर करतात. संगीत हा कार्यक्रमचा ट्रेन्ड अलिकडे फार वाढला आहे. याचे अनेक व्हिडीओही व्हायरल होत असतात. पण काही चुकांमुळे अशा कार्यक्रमात नवरी-नवरदेवांना लाजिरवाण्या क्षणांचा सामना करावा लागतो. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर एक संगीत सेरेमनीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात नवरी-नवरदेव डान्स करताना दिसत आहेत. मॅचिग ड्रेससोबतच दोघेही शानदार डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत. पण यादरम्यान एक छोटीशी चूक होते आणि नवरी-नवरदेवाला सर्वांसमोर लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागतो. (हे पण बघा : VIDEO : भावासमोरच वहिनीच्या मांडीवर जाऊन बसला दीर, व्हिडीओ व्हायरल...)

नवरदेव डान्स करताना नवरीला खांद्यावर उचलण्याचा प्रयत्न करतो. पण तो हे करत असताना स्टेजवर घसरतो. घसरला तरी तो स्वत:ला सावरतो आणि नवरीला खांद्यावर घेऊन उभा राहतो. समोर बसलेल्या लोकांकडे हात दाखवत सांगतो की, सगळं काही ठीक आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 

Web Title: Wedding video : Groom and bride falling on stage video goes viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app