Video: भरधाव कारची उंटाला जोरदार धडक, उंट कारमध्ये अडकला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 13:17 IST2018-08-09T13:14:46+5:302018-08-09T13:17:20+5:30
मीडिया रिपोर्टनुसार, ९ जुलैला राजस्थानच्या बीकानेरजवळ एका वेगाने जाणाऱ्या कारने एका उंटाला जोरदार धडक दिली.

Video: भरधाव कारची उंटाला जोरदार धडक, उंट कारमध्ये अडकला!
बीकानेर : वाळवंटातील जहाज म्हणून लोकप्रिय असलेल्या उंटाच्या एका विचित्र अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा अपघात इतका गंभीर आहे की, या कारचा समोरचा काच तोडून हा उंट कारमध्ये अडकला आहे. आपली सुटका करवून घेण्यासाठी उंट करत असलेली धडपड यात दिसत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ९ जुलैला राजस्थानच्या बीकानेरजवळ एका वेगाने जाणाऱ्या कारने एका उंटाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, उंट थेट कारचा समोरचा तोडून आत कारमध्ये जाऊन अडकला. त्याचं डोकं कारच्या छतातून बाहेर तर त्याचं बाकीचं शरीर दरवाच्या अडकले आहे. या कारच्या ड्रायव्हरला बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेच्या चार तासांनंतर उंटाला कारमधून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं. उंट गंभीर जखमी झाला असून त्याला पशु चिकित्सालयात दाखल करण्यात आलं आहे. उंटाला बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाने कारचा काही भाग कापला होता.