Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 14:07 IST2025-10-05T14:05:54+5:302025-10-05T14:07:27+5:30
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात मेट्रोतून प्रवास करणारे दोन प्रवासी एकमेकांना मारताना दिसत आहेत.

Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
Metro Viral Video: दिल्लीतीलमेट्रो प्रवासी सुविधांपेक्षा वाद आणि इतर कारणांमुळेच जास्त चर्चेत असते. अशीच एक हाणामारीची घटना मेट्रोत घडली आहे. दोन माणसांमध्ये वाद सुरू झाला. वाद वाढला आणि दोघांनीही एकमेकांना मारहाण सुरू केली. दोघेही एकमेकांना लाथा-बुक्क्या मारतात. इतर काही प्रवासी त्यांच्यातील वाद सोडवताना दिसत आहेत.
२३ सेकंदाच्या या क्लिपमध्ये दोन्ही व्यक्ती एकमेकांना ढकलाताना दिसत आहे. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर वाद वाढतो. त्यानंतर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला लाथ मारतो. त्यामुळे तो खाली पडतो. त्यानंतर आजूबाजूचे प्रवासी जमा होतात.
तोपर्यंत दोघेही एकमेकांना बुक्क्या मारतात. इतर प्रवाशांनी मध्यस्थी करत दोघांना बाजूला केले. त्यानंतरही दोघांमधील शाब्दिक चकमक सुरूच होती. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून जातात, पण लोक त्यांना आवरतात.
मेट्रोत प्रवाशांची एकमेकांना मारहाण, व्हिडीओ पहा
Delhi Metro mein aapka swagat hai pic.twitter.com/tvAY1Dz5nI
— Amitabh Chaudhary (@MithilaWaala) October 5, 2025
दिल्लीतील मेट्रोमध्ये मारहाणीच्या घटना सातत्याने घडत आहेत. ऑगस्ट महिन्यातच दोन महिलांमध्ये मारामारी झाली होती. दोन्ही महिला सीटवर बसलेल्या असतानाच वाद सुरू होतो. त्यानंतर एक महिला दुसऱ्या महिलेला खाली पाडते आणि केस धरते. मारहाण करते. अचानक गोंधळ उडतो. काही प्रवासी येतात आणि दोघींना दूर नेतात.