तहानलेल्या खारूताईनं पाण्यासाठी केली अशी विनवणी; Video पाहून व्हाल इमोशनल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 17:10 IST2020-07-17T17:09:51+5:302020-07-17T17:10:14+5:30

आतापर्यंत 4.2 लाखवेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे.  

Viral Video Of Thirsty Squirrel Asking For Water Melts Hearts | तहानलेल्या खारूताईनं पाण्यासाठी केली अशी विनवणी; Video पाहून व्हाल इमोशनल!

तहानलेल्या खारूताईनं पाण्यासाठी केली अशी विनवणी; Video पाहून व्हाल इमोशनल!

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यात तहानलेली खारूताई पाण्यासाठी ज्या प्रकारे त्या व्यक्तीला विनंती करत आहे, ते पाहून कुणीही सहज भावुक होईल. या व्हिडीओत हातात पाण्याची बॉटल घेऊन एक व्यक्ती दिसत आहे. ही खारूताई त्या व्यक्तीच्या पायानजीक येऊन दोन्ही हात पसरवून पाणी मागताना दिसत आहे. हा व्हिडीओ कधीचा व कुठला आहे, हे स्पष्ट होत नाही.

एक मुलगी आणि मुलगा त्या खारूताईकडे पाहत आहेत. माणसाच्या हातात त्या खारूताईला पाण्याची बाटली दिसली आणि त्यानंतर दोन्ही पायांवर उभी राहून तिनं त्याच्याकडे पाणी मागीतल. त्या व्यक्तीनंही त्या खारूताईला पाणी दिलं.  भारताचे वन अधिकारी सुसांता नंदा यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आतापर्यंत 4.2 लाखवेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे.  


 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

 

कसोटीत एकाच दिवशी पडल्या 27 विकेट्स; 132 वर्षांनंतरही वर्ल्ड रेकॉर्ड अबाधित 

Photo : हार्दिक पांड्याचं वडोदरातील लय भारी पेंटहाऊस; नजर हटणारच नाही! 

इंग्लंडच्या गोलंदाजानं गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी केली मोठी चूक अन् संपूर्ण संघावर आणलं कोरोना संकट! 

धक्कादायक : अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू; क्रीडा विश्वात हळहळ

हार्दिक पांड्यानं पोस्ट केला नताशासोबत रोमँटिक फोटो; नेटिझन्सनी पाडला कौतुकाचा पाऊस

लागली पैज; क्रिकेटच्या इतिहासात फलंदाजाला अशा 'विचित्र' पद्धतीनं बाद झालेलं पाहिलं नसेल 

हैदराबाद ते चेन्नई; बर्थ डे विश करण्यासाठी बॉयफ्रेंडच्या घरी पोहोचली खेळाडू, फोटो व्हायरल

Web Title: Viral Video Of Thirsty Squirrel Asking For Water Melts Hearts