धक्कादायक : अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू; क्रीडा विश्वात हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 10:11 AM2020-07-17T10:11:48+5:302020-07-17T10:13:03+5:30

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 10 लाखांच्या वर गेली आहे.

Ace Para-badminton Player Ramesh Tikaram Dies Of COVID-19 | धक्कादायक : अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू; क्रीडा विश्वात हळहळ

धक्कादायक : अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू; क्रीडा विश्वात हळहळ

googlenewsNext

भारताचे माजी पॅरा-बॅडमिंटनपटू रमेश टिकाराम यांचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले. पॅरा-बॅडमिंटन इंडियाचे अध्यक्ष एन सी सुधीर यांनी ही माहिती दिली. ''आज दुपारी रमेश टिकाराम यांचे निधन झाले, ही बातमी तुम्हाला देताना प्रचंड दुःख होत आहे,''असे सुधीर यांनी सांगितले.2002मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कारानं गौरविण्यात आले होते. (Former para-badminton player Ramesh Tikaram dies at 51)
 

51 वर्षीय रमेश यांना ताप आणि खोकला होता आणि 29 जूनला त्यांना बंगळुरू येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रमेश यांच्या मागे पत्नी व दोन मुलं असा परिवार आहे. 2001मध्ये देशात आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धा आणण्यात रमेश यांचा मोठा वाटा होता, असे त्यांचे सहकारी के व्हाय वेंकटेश यांनी सांगितले.( Former para-badminton player Ramesh Tikaram dies at 51)
 

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 39 लाख 50,035 इतकी झाली आहे. त्यापैकी 82 लाख 79,182 रुग्ण बरे झाले आहेत आणि 5 लाख 92,696 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 10 लाखांच्या वर गेली आहे. त्यापैकी 6 लाख 36,602 रुग्ण बरे झाले आहेत आणि 25,609 जणांचा मृत्यू झाला आहे.

Read in English

Web Title: Ace Para-badminton Player Ramesh Tikaram Dies Of COVID-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.