इंग्लंडच्या गोलंदाजानं गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी केली मोठी चूक अन् संपूर्ण संघावर आणलं कोरोना संकट!

इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

जोफ्रा आर्चरनं जैव सुरक्षा नियम मोडल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. आता त्याला पाच दिवस आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहे.

त्या काळात त्याची दोन वेळा कोरोना टेस्ट होईल आणि ती निगेटिव्ह आल्यानंतर त्याला खेळण्याची संधी मिळेल.

त्याच्या या कृतीमुळे संपूर्ण संघावर कोरोना संकट आलं आहे.

''झालेल्या चुकीबद्दल मी माफी मागतो. मी स्वतःलाच नव्हे, तर संपूर्ण संघ आणि व्यवस्थापकीय सदस्यांना संकटात आणले. माझी चूक मी मान्य करतो आणि सर्वांची माफी मागतो,''असे आर्चर म्हणाला.

पहिल्या कसोटीनंतर सर्व खेळाडू साऊदॅम्प्टन येथून वेगवेगळ्या वाहनांतून मँचेस्टर येथे पोहोचायचे होते. पण, आर्चर थेट मँनचेस्टरला न जाता तेथून दोन तास दूर असलेल्या ब्रिगटन येथे आपल्या घरी गेला.

त्या घरात त्याची गर्लफ्रेंड राहते आणि तिला भेटण्यासाठी तो तिथे गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. इंग्लंडमधील अनेक वृत्तपत्रांनी तसा दावा केला आहे.

जोफ्रानं पहिल्या कसोटीत 17 षटकांत 45 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या होत्या.