Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 15:32 IST2025-06-30T15:30:30+5:302025-06-30T15:32:12+5:30
सध्या सोशल मीडियावर देशी जुगाडाचा एक असा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे, जो पाहून नेटकऱ्यांचे डोके चक्रावले आहे.

Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
सध्या सोशल मीडियावर देशी जुगाडचा एक असा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे, जो पाहून नेटकऱ्यांचे डोके चक्रावले आहे. कडक्याच्या उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी एका व्यक्तीने अशी युक्ती शोधली आहे की, सगळेच अवाक् झालेत. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने फक्त एका पंख्याचा वापर करून एकाच वेळी तीन वेगवेगळ्या खोल्या थंड केल्या आहेत, आणि त्याने हे कसे केले, हे पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
काय आहे हा हटके जुगाड?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, त्या व्यक्तीने आपल्या बुद्धीचा वापर करत एक अद्भुत जुगाड केला आहे. त्याने एका मोठ्या पंख्याला पॉलिथिनने अशा प्रकारे जोडले आहे की, त्याचा एक मार्ग तयार झाला आहे. इतकेच नाही, तर या पॉलिथिनच्या पाईपमध्ये तीन जंक्शन लावून तो तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये सोडला आहे. यामुळे पंख्याची थंड हवा या मार्गातून एकाच वेळी तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये पोहोचत आहे, आणि काही लोक त्यात शांतपणे झोपलेलेही दिसत आहेत.
सोशल मीडियावर धमाल, मजेशीर प्रतिक्रियांचा पाऊस!
हा देशी जुगाड सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर 'munda_muktsar_toh' नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, जो पाहिल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये मजेशीर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. काही लोकांनी या व्यक्तीच्या कल्पकतेचे खूप कौतुक केले आहे, तर बहुसंख्य नेटकरी याला 'टेक्नोलॉजी' म्हणत त्याचे खूप कौतुक करत आहेत.
एका युजरने कमेंट केली की, "छा गए गुरु… एक तीर से तीन निशाने." दुसऱ्या एका यूजरने मिश्किलपणे म्हटले की, "भावाचा जुगाड तर जबरदस्त आहे, पण जर कोणी गॅस सोडला तर काय होईल, याचा विचार करून मला हसू आवरता येत नाहीये!" आणखी एका युजरने लिहिले की, "एकाने गॅस सोडला की, मग सगळ्यांचा खेळ खलास!"