बिनधास्त नवरी! नवरदेव जसा म्हणाला 'कबूल है', नवरी आनंदाने उड्या मारू लागली अन् सर्वांसमोर केलं त्याला किस....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 11:38 IST2021-05-25T11:33:50+5:302021-05-25T11:38:16+5:30

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरीसाठी हे लग्न एखाद्या स्वप्नाासारखं होतं आणि जशी ती लग्नाच्या बंधनात बांधली जाते तिचा आनंद गगनात मावेनासा होतो.

Viral video as soon as the groom said Kabul Hai bride jumped danced and kissed in public | बिनधास्त नवरी! नवरदेव जसा म्हणाला 'कबूल है', नवरी आनंदाने उड्या मारू लागली अन् सर्वांसमोर केलं त्याला किस....

बिनधास्त नवरी! नवरदेव जसा म्हणाला 'कबूल है', नवरी आनंदाने उड्या मारू लागली अन् सर्वांसमोर केलं त्याला किस....

अनेकदा लोक लग्नाबाबत इतके उत्सुक असतात की, त्यांना याचं भानच नसतं की ते कुठे आहेत. ते त्यांचा आनंद त्यांना हवा तसा व्यक्त करतात. लग्नात अनेकजण लग्नाच्या रितीरिवाजात बांधलेले असतात. त्यामुळे त्यांना वाटणारा आनंद हवा तसा व्यक्त करू शकत नाहीत. पण एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक नवरी तिचं लग्न झाल्यावर इतकी आनंदी झाली की, थेट जागेवर उड्या मारू लागली. 

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरीसाठी हे लग्न एखाद्या स्वप्नाासारखं होतं आणि जशी ती लग्नाच्या बंधनात बांधली जाते तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. निकाह लावणारे मौलवी साहेब जसे नवरदेवाला लग्न कबूल आहे का विचारतात, नवरदेव जसा  कबूल है बोलता नवरी आनंदाने उड्या मारू लागते. (हे पण बघा : पंडित जागेवरून गायब झाला तर नवरी-नवरदेव मंडपात करू लागले मस्ती, व्हिडीओ व्हायरल...)

नवरदेवाने कबूल है म्हटल्यावर नवरी आनंदाने जागेवरच सर्वांसमोर उड्या मारू लागते. इतकंच नाही तर सर्व पाहुण्यांसमोर नवरी नवरदेवाच्या गालावर किसही करते. नवरीच्या मागे बसलेली एक महिला तिला शांत राहण्यास सांगते. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ लोकांना खूप आवडलाय.

नवरीचा असा आनंद व्यक्त करणं फार कमी वेळा बघायला मिळतं. सामान्यपणे नवरी खाली मान घालून लाजत असते. पण या नवरीने कमालच केलीये. तिच्या या कारनाम्यामुळे सगळे पाहुणे हसायला लागतात. एखाद्या नवरीला लग्नाचा इतका आनंद झालेला तुम्ही याआधी कधी पाहिला नसेल.
 

Read in English

Web Title: Viral video as soon as the groom said Kabul Hai bride jumped danced and kissed in public