Viral Video: वाकडी तिकडी बाईक चालवणं पडलं महागात; भररस्त्यात टायर स्लिप अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 16:54 IST2026-02-25T16:49:08+5:302026-02-25T16:54:15+5:30

zig zag driving bike accident viral video: रस्त्याच्या मधोमध त्याचा तोल जातो अन् तो फरपटत जातो...

viral video social media zig zag bike riding boy accident slips on road shocking stunt trending | Viral Video: वाकडी तिकडी बाईक चालवणं पडलं महागात; भररस्त्यात टायर स्लिप अन् मग...

Viral Video: वाकडी तिकडी बाईक चालवणं पडलं महागात; भररस्त्यात टायर स्लिप अन् मग...

zig zag driving bike accident viral video: रस्त्यावर वेगाने गाडी चालवणे आणि धोकादायक स्टंट करणे ही सध्या फॅशन झाली असली तरीही असा प्रकार जीवावरही बेतू शकतो. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण भरधाव वेगाने वेडीवाकडी बाईक चालवताना (zig zag style) स्टंट मारण्याच्या प्रयत्नात आपले नियंत्रण गमावतो आणि त्याचा अपघात होतो.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा

नेमकी घटना काय?

व्हायरल व्हिडिओमध्ये एका रिकाम्या रस्त्यावर एक तरुण उगाचच आपल्या बाईकची गती वाढवून वेड्यावाकड्या स्टाईलने रायडिंग करताना दिसतो. तो बाईक डावीकडे आणि उजवीकडे अशी झिग झॅग पद्धतीने फिरवून शायनिंग मारत पुढे जात असतो. सुरुवातीला सर्व काही सुरळीत वाटते, मात्र अवघ्या काही सेकंदात त्याच्या बाईकचा तोल बिघडतो. बाईकचे चाक रस्त्यावर स्लिप होऊन घसरते आणि तो तरुण बाईकसह जोरात जमिनीवर आदळतो.

जीवावर बेतण्याची भीती

अपघात झाल्यानंतर तो तरुण बाईकसोबत थोडासा घसपटून पुढे जातो. सुदैवाने या अपघातात त्याला गंभीर दुखापत होत नाही, केवळ त्याच्या हाताला खरचटते. त्याच्या हाताला झालेली दुखापत व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते. पण अशा प्रकारच्या अपघातात पाठीचा कणा किंवा मानेचे हाड मोडण्याचा मोठा धोका असतोच, त्यासोबत जीवाचाही धोका असतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

सोशल मीडियावरील संताप

हा व्हिडिओ @Nalanda_index नावाच्या एक्स (ट्विटर) हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी या तरुणाच्या बेजबाबदारपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी याला 'छपरी स्टाईल' म्हणत, अशा लोकांमुळे रस्त्यावरील इतर निष्पापांचा जीव धोक्यात येतो, अशी टीका केली आहे.

Web Title : ज़िग-ज़ैग बाइक स्टंट पड़ा महंगा; वायरल वीडियो पर मचा बवाल

Web Summary : एक वायरल वीडियो में एक युवक खतरनाक ज़िग-ज़ैग स्टंट करते हुए बाइक दुर्घटनाग्रस्त हो गया। नियंत्रण खोने से वह फिसल गया और गिर गया, जिससे उसे मामूली चोटें आईं। इस घटना से ऑनलाइन आक्रोश फैल गया, कई लोगों ने सवार के लापरवाह व्यवहार की आलोचना की।

Web Title : Reckless Zig-Zag Bike Stunt Ends in Crash; Viral Video Sparks Outrage

Web Summary : A viral video shows a young man crashing his bike while attempting a dangerous zig-zag stunt. He lost control, skidded, and fell, suffering minor injuries. The incident sparked outrage online, with many criticizing the rider's reckless behavior and disregard for safety.