कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 13:41 IST2025-08-11T13:40:52+5:302025-08-11T13:41:40+5:30
कुत्रा, मांजर, ससा, घोडा..; Pet Day निमित्त विद्यार्थ्यांनी शाळेत आणले आपापले पाळीव प्राणी!

कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
Viral Video: हत्ती हा सर्वात प्रेमळ आणि बुद्धिमान प्राणी आहे. तुम्ही अनेकदा हत्ती आणि मानवाची अतुट मैत्री पाहिली असेल. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडिओ दक्षिण भारतातील असल्याचे दिसते. एका शाळेमध्ये 'पेट डे'चे आयोजन करण्यात आलेहोते. यानिमित्त मुलांनी आपल्या घरातील पाळीव प्राणी आणले. काही मुले कुत्र्याला घेऊन आले होते, तर काहीजण मांजरीला घेऊन आले होते. मात्र, एक मुलगा चक्क आपल्या पाळीव हत्तीला घेऊन पोहोचला.
हत्ती पाहून सर्वजण चकीत झाले
एका शाळेत 'पेट डे'चे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी मुलांना त्यांच्या पाळीव प्राण्यांना शाळेत आणण्याची परवानगी दिली, जेणेकरून ते त्यांच्या पाळीव प्राण्यांची इतर वर्गमित्रांशी ओळख करुन देऊ शकतील. व्हायरल व्हिडिओमध्ये मुलांनी कुत्रे, मांजर, पोपट, ससा, मासे आणि घोड्यासह तर इतर लहान मोठे प्राणी आणल्याचे दिसते. मात्र, यादरम्यान एक मुलगा चक्क आपल्या घरातील पाळीव हत्ती घेऊन शाळेत येतो.
हत्तीला पाहण्यासाठी गर्दी
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, तो मुलगा हत्तीवर स्वार होऊन शाळेच्या मैदानात येतो. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित सर्व अवाक् होतात. तो मुलगा त्याच्या हत्तीसह शाळेत पोहोचताच त्याला पाहण्यासाठी तिथे मुले, शिक्षक आणि इतर लोकांची गर्दी जमते. हत्तीला पाहून सर्वजण उत्साहित होतात. काहीजण हत्तीसोबत फोटो काढतात, तर काहीजण त्याचा व्हिडिओ बनवतात. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.