महिलेच्या ड्रेसवर चढला उंदीर आणि मग...; ५० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 03:37 PM2021-06-19T15:37:44+5:302021-06-19T15:39:41+5:30

एक महिला पॉसम नावाच्या जंगली उंदराला आपल्याकडे बोलवत होती. अशात तो उंदीर धावत जाऊन महिलेच्या ड्रेसला पकडतो.

Viral video of opossum wild rat trying to enter woman's dress weird video | महिलेच्या ड्रेसवर चढला उंदीर आणि मग...; ५० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला व्हिडीओ

महिलेच्या ड्रेसवर चढला उंदीर आणि मग...; ५० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला व्हिडीओ

Next

काही लोकांना रोमांचक जगात राहणं पसंत असतं. ते स्वत:ला खतरों के खिलाडी समजतात. ते खतरनाक स्टंट करण्यासोबतच जंगली प्राण्यांच्या आसपास फिरतात. त्यांच्यासोबत मस्ती करतात. अशात सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर FailArmy नावाच्या पेजवर हा खतरनाक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओत बघू शकता की, एक महिला पॉसम नावाच्या जंगली उंदराला आपल्याकडे बोलवत होती. अशात तो उंदीर धावत जाऊन महिलेच्या ड्रेसला पकडतो. त्यानंतर महिला त्याला काढण्यासाठी जागेवरच उड्या मारू लागते. (हे पण बघा : VIDEO : नवरदेवाने मंडपात नवरीसोबत केलं असं काही, पंडितजी म्हणाले - हात काढ....)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आतापर्यंत ५० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. पॉसम जंगलांमध्ये आढळणारा एक जंगली उंदीर आहे. काही ठिकाणी त्याला ओपॉसम असंही म्हणतात. दोन्ही एकमेकांपासून जरा वेगळे असतात. सामान्यपणे हे चावत नाहीत. पण त्यांना जेव्हा धोका जाणवतो तेव्हा चावायला संकोच करत नाहीत. यांच्या संपर्कात येऊन गंभीर आजारही होतात.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Viral video of opossum wild rat trying to enter woman's dress weird video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app