Video: हॉटेलमधून ऑर्डर केली 'कांदा भजी' अन् आलं बघा काय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 20:41 IST2022-06-17T20:41:26+5:302022-06-17T20:41:57+5:30
व्हिडीओ पाहून तुमचंही डोकं नक्कीच चक्रावून जाईल

Video: हॉटेलमधून ऑर्डर केली 'कांदा भजी' अन् आलं बघा काय...
Viral Video on Social media | कोरोना काळात तरूणाईमध्ये 'वर्क फ्रॉम होम'चे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यासोबतच आणखी एका गोष्टीची तरूणांना सवय लागली आहे, ते म्हणजे जेवणा-खाण्याची ऑर्डर. वेगवेगळ्या अँप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर खाण्यापिण्याचे पदार्थ मागवले जातात. पूर्वी भूक लागल्यानंतर मित्रमंडळी नाक्यावर किंवा एखाद्या छानशा हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता-जेवण करत असत. पण हल्ली छोट्यात छोटी गोष्टदेखील सरळ घरीच ऑर्डर मागवली जाते. दिल्लीत राहणाऱ्या उबेदू नावाच्या तरूणानेही एका रेस्टॉरंटमधून कांदा भजी ऑर्डर केली होती. पण त्याने जेव्हा घरी आलेली ऑर्डर उघडून पाहिली तेव्हा त्याला धक्काच बसला.
तरूणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला आलेला अनुभव सांगितला. त्या व्यक्तीने काहीही न बोलता सर्व काही कॅप्शन आणि फोटोतून सांगितले. त्याने व्हिडीओ मध्ये लिहिले होते की मित्रांनो मी कांदा भजी मागवली होती. पण त्यानंतर मला ऑर्डरमध्ये काय मिळाले पाहा. ऑर्डर नक्की काय आली आहे, त्यासाठी त्याने थेट कॅमेरा फिरवून जे दाखवले ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. कारण त्याने कांदा भजी मागवल्यानंतर त्याला कच्च्या कांद्याच्या रिंग्स पाठवून देण्यात आल्या होत्या. पाहा व्हिडीओ-
व्हिडिओमध्ये चिरलेला कच्चा कांदा एका भांड्यात ठेवलेला होता. या तरूणाचा चेहरा पूर्णपणे उतरला होता. खूप भूक लागली असताना असा प्रकार घडल्यावर दुसरं काय होणार.... तेच या तरूणाचं झालं. तरूणाने कांदा भजी मागवली अन् त्याच्या वाट्याला कच्चा कांदा आला. व्हिडिओमध्ये त्याने कांद्याच्या चकत्या हाताच्या बोटात अंगठीसारख्या घातल्या होत्या आणि त्याने व्हिडीओ शूट केला होता.