Video: कमालच झाली..!! बिबट्या थेट जाऊन सिंहीणीशीच भिडला, पुढे कोण जिंकलं... तुम्हीच पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 14:50 IST2023-03-04T14:49:30+5:302023-03-04T14:50:34+5:30

Leopard Lioness Fight in Forest, Viral Video: आधी बिबट्या हल्ला करतो, मग सिंहीणदेखील त्याच्यावर गुरगुरते...

Viral Video of leopard fights with lioness in forest what happened next see in detailed | Video: कमालच झाली..!! बिबट्या थेट जाऊन सिंहीणीशीच भिडला, पुढे कोण जिंकलं... तुम्हीच पाहा

Video: कमालच झाली..!! बिबट्या थेट जाऊन सिंहीणीशीच भिडला, पुढे कोण जिंकलं... तुम्हीच पाहा

Leopard Lioness Fight in Forest, Viral Video: बिबट्या अतिशय धोकादायक आणि चपळ प्राणी आहे. डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच तो शिकार घेऊन पसार होऊ शकतो. पण नुकताच जंगलातून एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात बिबट्या जाऊन थेट सिंहीणीशी भिडला. ही झुंज बराच वेळ चालली, पण लढाईच्या शेवटी असा काय खेळ पालटला की सिंहीण आक्रमक झाली अन् बिबट्याने गपचूप पळ काढला.

बिबट्या आणि सिंहीणीच्या झुंजीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये जंगलात एक झाड दिसत आहे. दोघेही झाडाच्या बाजूला भांडताना दिसत आहेत. दोघांमध्ये जोरदार भांडण होते. प्रथम बिबट्या सिंहिणीवर हल्ला करतो, त्यानंतर सिंहीण बिबट्यावर प्रतिहल्ला करते. मग अचानक सिंहीण बिबट्याला मागून पकडायचा प्रयत्न करते. बिबट्या थोडासा हालचाल करतो. सिंहीण त्याच्यावर भारी पडताना दिसते, पण चपळाईच्या जोरावर अखेर तो सिंहीणीच्या तावडीतून सुटून पटकन झाडावर चढून बसतो. बिबट्या वरती गेल्याचे पाहून सिंहीण झाडाखाली उभी राहते आणि त्याच्यावर गुरगुरते, पण बिबट्या काही केल्या पुन्हा खाली उतरत नाही. पाहा व्हिडीओ-

लोक या मजेशीर झुंजीचा सोशल मीडियावर आनंद घेत आहेत. अखेर बिबट्या प्राण वाचवण्यात यशस्वी होते हे साऱ्यांनाच दिसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एका यूजरने लिहिले आहे की बिबट्यालाही सिंहीणीच्या रागाचा अनुभव आला. तर दुसऱ्याने लिहिले आहे की, 'बिबट्या जाऊन सिंहाशी लढला नाही हे बरं झालं, नाही तर स्थिती आणखी वाईट झाली असती.' सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

Web Title: Viral Video of leopard fights with lioness in forest what happened next see in detailed