Viral Video: बेस्ट फ्रेंडसोबत लग्न झाल्याने नवरी झाली इतकी खुश की केलं भलतंच काम, पाहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 19:24 IST2022-04-24T19:18:27+5:302022-04-24T19:24:37+5:30
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत आहे. हा व्हिडीओ एक नवरीशी संबंधित आहे. जिचं लग्न आपल्या बेस्ट ब्रेंडसोबत ठरलं आहे.

Viral Video: बेस्ट फ्रेंडसोबत लग्न झाल्याने नवरी झाली इतकी खुश की केलं भलतंच काम, पाहा व्हिडिओ
इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल काही सांगू शकत नाही. सोशल मीडिया एक असं प्लॅटफॉर्म आहे, जेथे अनेकदा विचित्र तर कधी मजेशीर गोष्टी पाहायला मिळतात. मात्र अनेकदा सोशल मीडियावर हृदयाला स्पर्श करणाऱ्या गोष्टीही पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत आहे. हा व्हिडीओ एक नवरीशी संबंधित आहे. जिचं लग्न आपल्या बेस्ट ब्रेंडसोबत ठरलं आहे.
व्हिडीओमध्ये पाहू शकता की, ज्या मुला-मुलींचं लग्न ठरलं ते खूप चांगले मित्र आहेत. याचा मुलीला खूप जास्त आनंद होतो. मुलीचा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरचही स्मित येईल. व्हिडीओ इतका सुंदर आहे की, अनेकदा पाहिला जात आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, आपल्या लहान मित्रासोबत लग्न ठरल्यामुळे मुलगी खूप खूश आहे. तिचा आनंद चेहऱ्यावरही दिसत आहे. ती आपल्या साखरपुड्यात नाचताना दिसत आहे. यादरम्यान ती आपल्या मित्राचा हात पकडते आणि नाचते.
मुलीच्या चेहऱ्यावरील भाव पाहून नवरदेवही खूप खूष झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहे. प्रत्येकाला नेहमीच असा आनंद मिळत नाही, अशीही प्रतिक्रिया येत आहे. हा व्हिडीओ wedabout नावाच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवरुन अपलोड करण्यात आला आहे.