जबरदस्त, शानदार....! जवानाची ड्रम वादनाची स्टाईल पाहून तुम्हीही म्हणाल, वाह क्या बात ..., पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 02:04 PM2021-02-09T14:04:24+5:302021-02-09T14:05:08+5:30

Trending Viral News in Marathi : सोशल मीडियावर भारतीय सेनेच्या जवानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Viral Video in Marathi : Meet sam k daniel talented army drummer watch viral video | जबरदस्त, शानदार....! जवानाची ड्रम वादनाची स्टाईल पाहून तुम्हीही म्हणाल, वाह क्या बात ..., पाहा Video

जबरदस्त, शानदार....! जवानाची ड्रम वादनाची स्टाईल पाहून तुम्हीही म्हणाल, वाह क्या बात ..., पाहा Video

Next

रॉकिंग संगीत ऐकायला अनेकांना आवडतं. तुम्हालाही इतरांप्रमाणे ड्रम वादन ऐकायला आवडत असेल तर सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून तुम्ही खूप खुश व्हाल. सोशल मीडियावर भारतीय सेनेच्या जवानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक जवान मस्त ड्रम वाजवताना दिसून येत आहे. लोकांनी या जवानाच्या वादनावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

तर अनेकांनी ड्रम वाजवताना पाहून शानदार, जबरदस्त, जिंदाबाद असं म्हटलं आहे.  हा व्हिडीओ ट्विटर युजर @Maverickmusafir नं शेअर केला आहे.  त्यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, सॅम. के.  डॅनियलला भेटा. हे खूपच सुंदर आर्मी ड्रमर आहेत. त्यांची ड्रम वाजवण्याची पद्धत खूपच अद्भूत आहे. या व्हिडीओ ८ फेब्रुवारीला सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. लय भारी! मुळच्या भारतीय जोडप्यानं साडी अन् धोतर घालून केलं स्कीइंग; पाहा भन्नाट व्हिडीओ

 या व्हिडीओला आतापर्यंत ४९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले असून  ४ हजारापेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओनं नेटिझन्सचं मन  जिंकलं आहे. भारतीय जवानाच्या वादनाचा असा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल, १ हजारापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. बोंबला! कोरोनाची लस घेताच भलत्याच भाषेत बोलू लागला; व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी म्हणाले... 

Web Title: Viral Video in Marathi : Meet sam k daniel talented army drummer watch viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.