'अतिउत्साह' !! नदीत आंघोळीला गेला, पायाला काहीतरी टोचलं अन् निघाली मगर, मग पुढे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 16:59 IST2025-03-02T16:57:52+5:302025-03-02T16:59:21+5:30

Man swimming in River crocodile Viral Video: तो तरुण पाण्यात डुंबून पोहण्याचा आनंद लुटत असताना वेगळंच घडलं

viral video man swimming in river finds crocodile near feet below narrow escapes watch trending on social media | 'अतिउत्साह' !! नदीत आंघोळीला गेला, पायाला काहीतरी टोचलं अन् निघाली मगर, मग पुढे...

'अतिउत्साह' !! नदीत आंघोळीला गेला, पायाला काहीतरी टोचलं अन् निघाली मगर, मग पुढे...

Man swimming in River crocodile Viral Video:  हल्ली सोशल मीडियावर असे व्हिडिओ व्हायरल होतात ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. काही व्हिडिओ आपल्याला हसवतात, काही व्हिडिओ आपल्याला चीड आणतात तर काही व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर काटा येतो. सोशल मीडियाच्या युगात कधीही काहीही व्हायरल होऊ शकतं. सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो पाहून तुमच्याही अंगावर नक्कीच काटा येईल. या व्हिडिओमध्ये एक तरुण नदीत अंघोळ करत असताना अचानक मगर तिथे येते आणि मग पुढे काय घडते ते दाखवले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असे दिसते की एक तरुण एका नदीमध्ये आंघोळ करत आहे. तो तरुण पाण्यात डुंबून पोहण्याचा आनंद लुटत आहे. वर उन्हाच्या झळा लागत असल्यामुळे नदीच्या थंडगार पाण्यात त्याला खूपच आनंद मिळत आहे. शूटिंग करणारी व्यक्ती पाण्याबाहेर उभी असताना आंघोळ करणारा व्यक्ती तिच्यावर पाणी उडवण्याचा प्रयत्न करतो. त्याच वेळेस अचानक त्याला पायाजवळ काहीतरी जाणवतं. तो थोडासा अलर्ट होतो आणि नेमकं काय आहे ते पाहतो. ते पाहताच त्याला धक्का बसतो. कारण त्याच्या पायाजवळ चक्क मगर असते. मगरीला पाहून तो थेट पाण्यातून धूम ठोकून बाहेर निघतो. नशीब बलवत्तर म्हणूनच तो पूर्णपणे बाहेर घेण्यात यशस्वी ठरतो. त्याला वेळेत कळले नसते तर मोठा अनर्थ घडला असता.


हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ खाली अनेक जण या तरुणाला ओरडताना दिसत आहेत. तसेच जास्तीचे धाडस करू नये, असेही बजावताना दिसत आहे तर काही लोक त्याच्या नशिबावर फिदा झाले आहेत.

Web Title: viral video man swimming in river finds crocodile near feet below narrow escapes watch trending on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.