Viral Video: भारीच आयडिया! रस्त्याच्या कडेलाच लोक करतात लघुशंका, महापालिकेने बघा काय केलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 15:35 IST2026-05-07T15:29:56+5:302026-05-07T15:35:38+5:30
Mysuru: स्वच्छता कोणाला नको असते? पण तरीही बहुतांश सार्वजनिक ठिकाणी घाण दिसतेच. लोक उघड्यावर लघुशंका करतात. याच समस्येवर मैसुरुमध्ये एक पर्याय शोधण्यात आला.

Viral Video: भारीच आयडिया! रस्त्याच्या कडेलाच लोक करतात लघुशंका, महापालिकेने बघा काय केलं?
भारतात अनेक शहरांमध्ये फिरत असताना बहुतांश वेळा लोक रस्त्याच्या बाजूला लघुशंका करताना दिसतात. असे करू नये म्हणून स्थानिक प्रशासनाकडून प्रयत्न केले जातात. पण, लोकांची सवय काही जात नाही. यावर उपाय म्हणून मैसुरू महापालिकेने एक शक्कल लावली. त्यांनी संपूर्ण रस्त्याच्या कडेनेच आरसे लावले.
मैसुरू शहरात करण्यात आलेल्या उपाययोजनेचा एका व्यक्तीने व्हिडीओ शेअर केला आहे. द शशांक नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ही कल्पना ज्याची कुणाची असेल, त्याला नोबेल पुरस्काराच्या पात्रतेचा आहे.
रस्त्याच्या कडेला आरसे
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ज्या ठिकाणी लोक लघुशंका करतात त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने आरसे लावण्यात आले आहेत. फूटपाथला लागूनच हे आरसे लावण्यात आले आहेत. जो कोणी व्यक्ती लघुशंका करायला जाईल, त्याचा चेहरा इतरांना दिसेल, ते बघून त्यालाच लाज वाटेल अशा विचाराने हे आरसे लावण्यात आलेले आहेत.
🚨 Authorities in Mysuru install large mirrors roadside to stop people from urinating in public. 👌
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) May 7, 2026
(📷-@theshashank_p) pic.twitter.com/xZPRUJkROc
काही लोकांनी मात्र, यावर टीका केली आहे. प्रशासन मूळ गोष्टी करायच्या सोडून नको ते उपाय करत बसते. मूळात या रस्त्यावर शौचालय आणि मुतारी बांधायला हवी. ते न करता असे करत आहे. त्यावर एकाने कमेंट केली आहे की, जिथे हे आरसे लावण्यात आले आहेत, तिथूनच १०० मीटर अंतरावर ४ टॉयलेट आहेत; पण लोक काही सुधरत नाहीये.