Viral Video: मेट्रोमध्ये तरूणाने काढली तरूणीची छेड, मग मिळालं असं उत्तर की...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 01:21 PM2021-09-11T13:21:21+5:302021-09-11T13:21:54+5:30

व्हायरल फनी व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, मेट्रोमध्ये एक तरूण मास्क लावून बसलेला आहे. तेच त्याच्यासमोर एक तरूणी मास्क लावून उभी आहे.

Viral video girl slapped boy in metro funny viral video | Viral Video: मेट्रोमध्ये तरूणाने काढली तरूणीची छेड, मग मिळालं असं उत्तर की...

Viral Video: मेट्रोमध्ये तरूणाने काढली तरूणीची छेड, मग मिळालं असं उत्तर की...

Next

तुम्ही नेहमीच तरूणीसोबत छेडछाड केल्याच्या घटना ऐकत असता. अनेकदा तर आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरतात. तर अनेकदा गर्दीत ते सापडतात आणि लोक त्यांची धुलाई करतात. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ बघून तर हसू येतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे. यात एका तरूणाने एका तरूणी ज्या प्रकारे 'छेडलं' तर त्याची त्याला मिळालेली शिक्षा पाहून हसू येईल.

व्हायरल फनी व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, मेट्रोमध्ये एक तरूण मास्क लावून बसलेला आहे. तेच त्याच्यासमोर एक तरूणी मास्क लावून उभी आहे. अचानक तरूणाला घामाची दुर्गंधी येते. आधीतर तरूण हे चेक करतो की, त्याला त्याच्या घामाची दुर्गंधी येते का. जेव्हा त्याच्या काही येत नाही तेव्हा तो तरूणीकडे बघतो. त्यानंतर बॅगमधून परफ्यूमची बॉटल काढतो आणि तरूणीच्या काखेवर स्प्रे करतो. जसा तो स्प्रे करतो तरूणी घाबरते आणि मग रागाने त्याला एक कानशिलात लगावते. (हे पण बघा : VIDEO : लग्नात स्टेजवर येऊन नवरीसमोर नाचला तरूण, पण काहीच न करता भाव नवरदेव खाऊन गेला)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत दोघांचा अंदाज पाहून लोकांना हसू येत आहे. कारण हा व्हिडीओ केवळ मनोरंजनासाठी तयार करण्यात आला आहे. यात आपल्याला नाटकीय रूपांतर बघायला मिळतं. लोक हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघत आहेत. 'hepgul5' या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 
 

Web Title: Viral video girl slapped boy in metro funny viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.