Video: थरारक! दोन गरुडांमध्ये शिकारीवरून हवेतच जुंपली, कोलांटी उड्या मारत पुढे जे झालं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 16:19 IST2024-06-06T16:18:19+5:302024-06-06T16:19:17+5:30

eagle battle viral video: दोन प्राणी शिकारीसाठी भांडत असतानाचे अनेक व्हिडीओ बरेचदा तुम्ही नक्कीच पाहिले असतील.

viral video eagle battle mid air for fish leaves internet stunned on social media | Video: थरारक! दोन गरुडांमध्ये शिकारीवरून हवेतच जुंपली, कोलांटी उड्या मारत पुढे जे झालं...

Video: थरारक! दोन गरुडांमध्ये शिकारीवरून हवेतच जुंपली, कोलांटी उड्या मारत पुढे जे झालं...

eagle battle viral video: तुम्ही सोशल मीडिया वापरत असाल तर तुम्हाला अनेक व्हायरल व्हिडिओ दिसत असतील. दोन प्राणी शिकारीसाठी भांडत असतानाचे अनेक व्हिडीओ बरेचदा तुम्ही नक्कीच पाहिले असतील. पण तुम्हाला माहित आहे का की, पक्षीदेखील हवेत उडतानाही शिकार हिसकावण्यासाठी भांडण करतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये दोन गरुड आपल्या शिकारीसाठी लढताना दिसत आहेत आणि हा व्हिडीओ व्हायरल देखील होत आहे.

इन्स्टाग्रामवर मुकुल सोमण नावाच्या युजरने शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, एरियल डेथस्पिनमध्ये उतरताना, एक मोठे आणि एक छोटे गरुड यांच्यात शिकारीवरुन चांगलीच जुंपली. छोटे गरुड शिकार घेऊन उडत असताना मोठे गरुड आले आणि त्यानंतर त्यांच्यात सामना रंगला.

व्हिडिओमध्ये दोन गरुड हवेत एकमेकांशी झुंजताना आणि लढताना दिसत आहेत. दोन्ही गरुडांनी एकच मासा आपल्या पंजांनी पकडून ठेवला आणि तो हिसकावण्यासाठी सर्व शक्ती वापरताना दिसले. दोघेही शिकार मिळविण्यासाठी हवेत अनेक वेळा कोलांटी मारतात, पण शेवटी मासा त्यांच्या पकडीतून सुटतो आणि जमिनीवर पडतो असे व्हिडीओमध्ये दिसते.

गरुडांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ६३ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच लाखो लोकांनी हा लाईक केला आहे.

Web Title: viral video eagle battle mid air for fish leaves internet stunned on social media