Viral Video : कमालच झाली राव! कोंबडा बोलू लागला अल्लाह अल्लाह; तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 18:15 IST2021-05-14T18:11:08+5:302021-05-14T18:15:28+5:30
Viral Video : हा व्हिडीओ एका कोंबड्याचा आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण हा कोंबडा चक्क अल्लाह अल्लाह असं म्हणत आहे.

Viral Video : कमालच झाली राव! कोंबडा बोलू लागला अल्लाह अल्लाह; तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ
सोशल मीडियावर प्राण्याचे, पक्ष्यांचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकीत होतात तर काही व्हिडीओ फारच गमतीदार असतात. तुम्हालाही तोंडात बोंट घालायला लावेल असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ एका कोंबड्याचा आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण हा कोंबडा चक्क अल्लाह अल्लाह असं म्हणत आहे.
आज रमजान ईदच्या दिवशी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं लोकांचा तुफान प्रतिसाद या व्हिडीओला मिळत आहे. तसंच वेगवेगळ्या माध्यामातून हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल पोपट, कबुतर पाळला असेल तर माणसांप्रमाणे तेही तसाच आवाज काढत नक्कल करतात. पण कोंबड्याला नक्कल करताना पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं आहे. या व्हिडीओमध्ये कोणतरी व्यक्ती अल्लाह बोलत आहे. त्यानंतर त्या व्यक्तीच्या मागे कोंबडा सुद्धा तेच म्हणत आहे. मुलाच्या तोंडातलं छिद्र पाहून घाबरली आई; डॉक्टरांनी लक्षात आणून दिली मोठी चूक
‘reelkerofeelkero’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी कोंबड्याचे बोलणे पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. आतापर्यंत ८०० पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. १० दिवस झाले ICU बेड मिळत नाही; तोंडावर ऑक्सिजन मास्क लावून एकटीच लढतेय तरूणी; समोर आला व्हिडीओ