बापरे! मुलाच्या तोंडातलं छिद्र पाहून घाबरली आई; डॉक्टरांनी लक्षात आणून दिली मोठी चूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 03:25 PM2021-05-14T15:25:13+5:302021-05-14T15:31:56+5:30

त्यावेळी या मुलाची आई खूपच घाबरलेल्या अवस्थेत होती. 

Mom take baby to hospital with hole in mouth but realise mistake nurse find it was a sticker | बापरे! मुलाच्या तोंडातलं छिद्र पाहून घाबरली आई; डॉक्टरांनी लक्षात आणून दिली मोठी चूक

बापरे! मुलाच्या तोंडातलं छिद्र पाहून घाबरली आई; डॉक्टरांनी लक्षात आणून दिली मोठी चूक

googlenewsNext

सोशल मीडियावर सध्या एका चिमुरड्याचा फोटो व्हायरल होत आहे.  तुम्ही असा प्रकार याआधी कधीही पाहिला नसेल. या लहान मुलाच्या  तोंडात छिद्र झालेलं तुम्ही पाहू शकता. जेव्हा या मुलाच्या आईला या छिद्राबाबत कळलं तेव्हा तिनं लगेचंच रुग्णालयात गाठलं. त्यावेळी या मुलाची आई खूपच घाबरलेल्या अवस्थेत होती. तोंड असं का दिसतंय काहीही कळायला मार्ग नव्हता.

डॉक्टरानी दिलेल्या माहितीनुसार हे  कोणतंही छिद्र नसून कोणत्यातरी उत्पादनाचे स्टिकर आहे. इंग्लँडमधील रहिवासी असलेल्या Becky Stiles नावाची महिला आपल्या १० महिन्याच्या मुलाचे डायपर बदलत होती. अचानक मुलाच्या तोंडात असं काही दिसल्यानंतर ही महिला फारच  घाबरली.

महिलेनं सांगितले की, ''जेव्हा मी मुलाच्या जखमेला हात लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो खूप किंचाळला. माझे हात कापत होते. खूप घामही येत होता. जेव्हा  मी त्याला घेऊन रुग्णालयात गेली तेव्हा लक्षात आलं की,  हे छिद्र नसून एक स्टिकर  चिकटलं आहे. ''

डॉक्टरांनी आपला हात या मुलाच्या घश्यात टाकत आराामात स्टिकर काढून टाकलं त्यानंतर वातावरणात थोडा बदल झाला आणि मुलाची आईसुद्धा हसू लागली. मुलाची काळजी घेण्यात निष्काळजीपणा केल्यानं हा प्रकार घडला असावा. असं मत सोशल मीडिया युजर्सनं मांडलं आहे. 

Web Title: Mom take baby to hospital with hole in mouth but realise mistake nurse find it was a sticker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.