Viral video of a bird : कमाल! फक्त १० सेकंदात चिमणीनं दाखवली घसा साफ करायची सोपी आयडिया, तुम्हीही लगेच शिकून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 16:11 IST2021-04-20T16:04:27+5:302021-04-20T16:11:25+5:30
Viral video of a bird : तुमच्यापैकी बऱ्याचजणांना आतापर्यंत अनेकदा या पद्धतीनं गुळण्या करून घसा साफ केला असेल.

Viral video of a bird : कमाल! फक्त १० सेकंदात चिमणीनं दाखवली घसा साफ करायची सोपी आयडिया, तुम्हीही लगेच शिकून घ्या
सोशल मीडियावर प्राण्यांचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकीत होतात. तर काही व्हिडीओ पाहून तुफान मनोरंजन होतं. एका पक्ष्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विटरवर या व्हिडिओला खूप पसंती दिली जात आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण या व्हिडीओत चक्क चिमणीनं घसा साफ करण्याची आगळी वेगळी ट्रिक दाखली आहे. तुमच्यापैकी बऱ्याचजणांना आतापर्यंत अनेकदा या पद्धतीनं गुळण्या करून घसा साफ केला असेल.
This is the way to gargle if u have a sore throat ☺️
— Susanta Nanda IFS (@susantananda3) April 20, 2021
(As shared) pic.twitter.com/CMpLsRdNuq
भारतातील सर्वात हुशार चोर ज्याने जज बनून लावला अनेक केसेसचा निकाल, ९५ वेळा झाली आहे अटक!
हा व्हिडिओ केवळ 10 सेकंदांचा आहे. आतापर्यंत अडीच हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. प्रत्येकजण या पक्ष्याची प्रशंसा करीत आहे. इतकेच नव्हे तर ट्विटर वापरकर्त्यांनीही पक्षीची समजूत काढणे पाहून आश्चर्यचकित झाले आहे. प्रत्येकजण त्याचे कौतुक करत आहेत.
हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा (आयएफएस सुशांत नंदा) यांनी शेअर केला आहे. असे अनेक ट्रेडींग व्हिडिओ त्याच्या प्रोफाईलवर पाहिले जाऊ शकतात. ते त्यांच्या अकाऊंटवर प्राणी आणि पक्ष्यांचे बरेच व्हिडिओ शेअर करतात. लोक अनेकदा हे व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित होतात. सध्या पोस्ट केलेला चिमणीचा हा व्हिडीओ पाहून लोक चिमणीसुद्धा घसा साफ करण्यासाठी असं काही करू शकते, याचा विचार करत आहेत.