Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 15:50 IST2025-07-02T15:48:23+5:302025-07-02T15:50:36+5:30

Baby Elephant Viral Video : एका हत्तीच्या पिल्लाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकून घेतले आहे.

Viral Video: Baby elephant scared of a frog; Cuteness video wins the hearts of netizens! | Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!

Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!

इंटरनेटच्या या युगात कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या एका हत्तीच्या पिल्लाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकून घेतले आहे. हत्तीच्या पिल्लाचा क्यूटनेस पाहून नेटकरी देखील त्याचे खूप कौतुक करत आहेत. व्हिडीओमध्ये दिसणारं हे हत्तीचं पिल्लू एका छोट्याशा बेडकाला घाबरलं आहे. या बेडकाला भिऊन त्याने अक्षरश: जागेवरच उड्या मारल्या. त्याच्या या गोड कृतीने सगळ्यांची मने जिंकली आहेत. 

हत्ती हा तसा शांतता प्रिय प्राणी आहे. हत्तीची छोटी पिल्लं धमाल मस्ती करणारी असतात. याचीच प्रचिती या व्हिडीओमधून येत आहे. हत्ती कितीही धिप्पाड प्राणी असला, तरी अगदी छोट्याशा जीवलाही तो किती घाबरतो, हे या व्हिडीओमधून पाहायला मिळाले आहे. 

काय आहे या व्हिडीओमध्ये?
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये हत्तीचं पिल्लू आंघोळ करत मस्ती करताना दिसत आहे. सोंड उंचावून, पाणी उडवत त्याची धमाल सुरू आहे. याच दरम्यान एक बेडूक उड्या मारत हत्तीजवळ जातो. या बेडकाला पाहून हत्तीच्या पिल्लाची गाळण उडते. आपला पाय त्या बेडकावर पडू नये, म्हणून हत्ती देखील उड्या मारू लागतो. इतक्यात तो बेडूक त्याच्या जवळून निघून जातो. 


या हत्तीचा हा क्यूट व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील 'rajamannai_memories' या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ९ लाख लोकांनी पाहिला असून, नेटकरी यावर भरभरून कमेंट्स देखील करत आहेत. सगळेच या हत्तीच्या पिल्लाचं खूप कौतुक करत आहेत.   

Web Title: Viral Video: Baby elephant scared of a frog; Cuteness video wins the hearts of netizens!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.