VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 11:10 IST2025-09-22T11:01:32+5:302025-09-22T11:10:59+5:30

Viral Video : एका रिक्षाचालकाने चक्क परदेशी भाषेत बोलून एका विदेशी पर्यटकालाही आश्चर्यचकित केले आहे.

VIRAL: Rickshaw driver asks a question in French to a foreigner sitting in a rickshaw; what happened next... | VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...

VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...

भारतात अनेक लोकांना एकापेक्षा जास्त भाषा बोलता येतात. काहीं तर विदेशी भाषा देखील येतात. पण एखाद्या रिक्षाचालकाला परदेशी भाषा बोलता येत असेल, आणि ती ही अगदी अस्खलित... याचा विचार कदाचित कुणीच केला नसेल. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओने ही समजूत पूर्णपणे खोटी ठरवली आहे. एका रिक्षाचालकाने चक्क परदेशी भाषेत बोलून एका विदेशी पर्यटकालाही आश्चर्यचकित केले आहे.

काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?

हा व्हिडीओ एका अमेरिकन कंटेंट क्रिएटरने बनवला आहे, जो सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जय नावाचा हा कंटेंट क्रिएटर रिक्षातून प्रवास करत असताना रिक्षाचालकाशी बोलताना दिसतो. तो रिक्षाचालकाला सांगतो की त्याला दोन भाषा येतात – इंग्रजी आणि फ्रेंच.

हे ऐकताच रिक्षाचालकाने लगेच फ्रेंच भाषेत विचारले, ‘तुम्ही फ्रेंच बोलता का?’ एका रिक्षाचालकाच्या तोंडून फ्रेंच ऐकून जयला आश्चर्याचा धक्का बसला आणि तो हसू लागला.


१५ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला व्हिडीओ
हा मजेशीर व्हिडीओ 'jaystreazy' नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. 'जेव्हा तुमचा ड्रायव्हर भारतात फ्रेंच बोलतो' असे कॅप्शन त्याला देण्यात आले आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १.५ दशलक्ष म्हणजेच १५ लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. ४८  हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले असून, अनेक मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

एका युझरने लिहिले की, 'हा रिक्षावाला तुमच्यापेक्षा जास्त भाषा बोलू शकतो.' तर दुसऱ्या एकाने कमेंट केली की, 'त्याने तुम्हाला स्कॅन केले आणि लगेच त्याची भाषा सक्रिय केली.' आणखी एका युझरने 'याला भाषा डाउनलोड करायला फक्त पाच सेकंद लागले' अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली. 'हा रिक्षावाला दुसऱ्याच जगातला वाटतो', असेही एकाने म्हटले आहे.

Web Title: VIRAL: Rickshaw driver asks a question in French to a foreigner sitting in a rickshaw; what happened next...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.