शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

Viral : लॉकडाऊनमध्ये नवं जोडपं बुलेटवर फिरायला निघालं; पोलिसांनी अडवताच झालं असं काही..., पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 12:52 PM

Viral Video : आता एका नवविवाहित जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि मृतांची संख्या रोखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. लॉकडाऊनचे पालन न करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करताना दिसून येत आहेत. नियम मोडत असलेल्या नागरिकांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील.  आता एका नवविवाहित जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता जोडप्याला पोलिसांनी (Police congratulate to newly married couple for following covid protocols video viral) शाबासकी दिली आहे.  पोलिस दुचाकीवरून निघालेल्या या नवविवाहित जोडप्याला शाबासकी देतात कारण कोरोनाच्या नियमांचे पालन केल्यामुळे या दोघांनीही पोलिसांचे मन जिंकले आहे. पोलिसांनी आधी हार घालून  जोडप्याचा सत्कार केला. इतकंच नाही तर शुभेच्छा म्हणून रक्कमही दिली. नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं

अधिकारी दिपांशू काबरा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आतापर्यंत ५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. अनेकांनी कौतुकस्पद कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या जोडप्याला मान सन्मान देऊन तसेच त्यांना पैसे देऊन पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पोलिसांच्या याच कृतीमुळे हा व्हिडीओ नेटिझन्सच्या पसंतीस उतरला आहे. बापरे! किचनचा तुटलेला पाईप जोडण्यासाठी प्लंबरनं मागितले ४ लाख; व्हायरल होतोय पावतीचा फोटो

 एकाच बाईकवर अख्खी जत्रा घेऊन लग्नाला निघाला

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एका दुचाकीस्वाराचा फोटो तुफान व्हायरल झाला  होता. कुटुंबातील ६ लोक एकाच एकाच बाईकवर बसून लग्नाला जात होते. आता तुम्ही म्हणाल दोन सीट्सच्या बाईकवर इतके लोक कसे काय बसतील? हा फोटो पाहून तुमची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी हा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला होता.  या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं होतं की, 'लग्नाला जायचं होतं म्हणून मास्क लावला आणि #Roadsefty ला ठेंगा'. 

समोर आलेल्या माहितीनुसार संपूर्ण कुटुंब कर्फ्यूच्या काळात एका लग्नाला हजेरी लावण्यासाठी जात होते. त्यावेळी  पोलिसांना त्यांना अडवलं. या सगळ्यांनी मास्क तर लावले होते. पण सोशल डिस्टेंसिंग आणि  वाहतुकीच्या नियमांना मात्र चांगलंच धाब्यावर बसवलं होतं. पोलिसांनी सुरूवातीला या लोकांना हात जोडले. त्यानंतर चालान कापून चालकाची समजूत काढून त्याला घरी पाठवण्यात आलं. 

 

टॅग्स :marriageलग्नSocialसामाजिकSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिस