VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 13:56 IST2025-09-11T13:55:14+5:302025-09-11T13:56:09+5:30
Viral Video : सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा पाहायला मिळाला आहे.

VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
Train Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काहीच सांगता येत नाही. एखादा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला की, तो जगभरात आगीसारखा पसरतो. सध्या देखील सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा पाहायला मिळाला आहे. हा व्हिडीओ बघितल्यानंतर काय प्रतिक्रिया द्यावी यावरून देखील नेटकरी गोंधळून गेले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये ट्रेनच्या एका एसी डब्यात लोअर बर्थवर एक प्रेमी युगूल बसलेलं दिसत आहे. या दोघांमध्ये थोडीशी रडारड देखील सुरू आहे. या जोडप्यातील मुलगी "माझे बाबा या नात्याला स्वीकारणार नाहीत" असं म्हणत आहे. तर, रडत, ओरडत असलेल्या या मुलीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिच्यासोबत असलेल्या मुलाने थेट तिच्या भांगेत कुंकू भरले. अवघ्या २४ सेकंदाचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेमकं काय झालं?
धावत्या ट्रेनमध्ये एक प्रेमी जोडपं आपलं प्रेम सफल होणार नाही, म्हणून रडताना दिसत आहे. माझे बाबा हे नातं स्वीकारणार नाही, हे मुलगी मुलाला रडून ओरडून समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यांच्यासोबत बसलेले मुलाचे मित्र मुलीवर लग्न करण्यासाठी दबाव आणताना दिसत आहेत. या दरम्यान व्हिडीओ रेकॉर्ड करणारा मुलगा मुलीला विचारतो की, 'बाबा नको मानू दे, पण तुम्ही खूश आहात ना?' यावर दोघेही होकारार्थी उत्तर देतात. यानंतर मुलगा उठून मुलीच्या कपाळावर कुंकू लावतो. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार धावत्या ट्रेनमध्ये घडला आहे.
हा व्हायरल व्हिडीओ 'asli.shubhh' नावाच्या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. 'चांगलं मनोरंजन झालं' असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. आता यावर नेटकरी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.